काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:07 PM2021-11-16T15:07:58+5:302021-11-16T15:14:38+5:30

Diamond Crossing : या ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी असेल.

What is diamond crossing know about its and importance | काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन?

काय असते ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग आणि कशी जाते यावरून ट्रेन?

googlenewsNext

Diamond Crossing : ट्रेनचा प्रवास करताना अनेकदा तुम्ही ट्रेनचे ट्रॅक पाहिले असतील. हे ट्रॅक इतके आडेवेढे घेतलेले का असतात असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. ट्रेनचे ट्रॅक असे असण्यामागे ट्रेनचे रूटही असतात. ट्रेन ज्या रूटने जाते ट्रॅक त्याच हिशेबाने अॅडजस्ट केलेले असतात. या ट्रॅकमध्ये एक खासप्रकारचा ट्रॅक असतो. ज्याला डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणतात.

या ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी असेल. त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित होतात की, हे ट्रॅक पूर्णपणे डायमंड क्रॉसिंग नाहीत. अशात डायमंड रेल्वे क्रॉसिंग कसं असतं हे जाणून घेऊया.

रेल्वे ट्रॅकच्या जाळ्यात एका रस्त्याच्या चौकासारखं क्रॉसिंग असतं. ज्याला डायमंड क्रॉसिंग किंवा चौक म्हटला जातो. या क्रॉसिंगच्या चार दिशांनी रेल्वे क्रॉस होते. डायमंड क्रॉसिंग रेल्वेसाठी त्याचप्रमाणे काम करतं ज्याप्रमाणे रस्त्यावर एक चौक किंवा ट्रॅफिक लाइट काम करतो. यात साधारण चार रेल्वे ट्रॅक असतात. जे दिसायला डायमंडसारखे असतात. त्यामुळे त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. सामान्यपणे जे रेल्वे क्रॉसिंग असतात ते एकाच दिशेने एकमेकांना कापतात. पण यात तसं नसतं.

भारतात कुठे आहे डायमंड रेल्वे क्रॉसिंग

काही रिपोर्ट्सनुसार भारतात केवळ नागपूरला डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे. जिथे चाारही बाजूने ट्रेनसाठी रेल्वे क्रॉसिंग आहे. पण अनेक रिपोर्ट्समद्ये असाही दावा करण्यात आला आहे की, नागपूरचं रेल्वे क्रॉसिंग डायमंड रेल्वे क्रॉसिंगच्या मापदंडात खरं उतरत नाही. कारण इथे केवळ ३ ट्रॅक आहेत. त्यामुळे याला डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणता येणार नाही.

नागपूरला ईस्टमध्ये गोंदियाहून एक ट्रॅक येतो, हावडा-राउकेला-रायपूर लाइन आहे. दुसरा ट्रॅक दिल्लीहून येतो. तेच साउथकडूनही एक ट्रॅक येतो आणि वेस्ट मुंबईहूनही एक ट्रॅक येतो. अशात याला डायमंड क्रॉसिंग म्हटलं जातं.
 

Web Title: What is diamond crossing know about its and importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.