जपानमध्ये लग्नाची एक नवीन पद्धत जोरात, ना करत प्रेम ना ठेवत फिजिकल रिलेशन...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:13 PM2024-05-11T12:13:00+5:302024-05-11T12:45:32+5:30
जपानमध्येही लग्नाबाबत एक वेगळी कॉन्सेप्ट समोर येत आहे. इथे तरूणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेजची पद्धत वाढत आहे.
दोन शरीरांसोबतच दोन आत्म्यांचं मिलन म्हणजे लग्न. फार पूर्वीपासून चालत आलेल्या लग्नाच्या या परंपरेत वेळोवेळे काही बदलही होताना दिसतात. असाच एक बदल म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिप. यात लग्न न करता दोन व्यक्ती पती-पत्नीसारखे राहू शकतात. अशात जपानमध्येही लग्नाबाबत एक वेगळी कॉन्सेप्ट समोर येत आहे. इथे तरूणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेजची पद्धत वाढत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लग्नाची ही एक नवीन पद्धत आहे. ज्यात तरूण आणि तरूणी लग्न करत करतात, पण त्यांच्यात प्रेम किंवा फिजिकल रिलेशन होत नाही. असं सांगितलं जात आहे की, जपानमधील जास्तीत जास्त तरूण ही पद्धत स्वीकारत आहेत.
काय आहे Friendship Marriage?
फ्रेंडशिप मॅरेजमध्ये कपल लीगली मॅरिड असतं. पण पत्नीसारखे रोमान्स किंवा इतर दुसऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. त्यांना हवं असेल तर ते आयव्हीएफ किंवा इतर माध्यमातून बाळांना जन्म देऊ शकतात. या पद्धतीत दोन्ही पार्टनर तिसऱ्याच व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये राहण्याची सूट असते.
SCMP ला अशाच एका कपलने मुलाखतीत सांगितलं की, फ्रेंडशिप मॅरेज आपल्यासारख्या विचार करणाऱ्या रूममेटला निवडण्यासारखं आहे. या लग्नात पार्टनर हेही ठरवू शकतात की, ते कोणता खर्च शेअर करतील. कामही वाटून घेऊ शकतात.
SCMP च्या रिपोर्टनुसार, 32 पेक्षा जास्त वय असलेले तरूण असं लग्न करण्यावर भर देत आहेत. हे लग्न असेही लोक करत आहेत ज्यांना लग्नानंतरही फ्री रहायचं आहे. अशाप्रकारच्या लग्नाचे रेकॉर्ड ठेवणारी संस्था Colorus नुसार मार्च 2015 ते आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांनी असं लग्न केलं आहे आणि आपला परिवारही वाढवला आहे.