Optical Illusion: या कवटीमध्ये दडलंय काय? या मानवी कवटीमध्ये तुम्हाला एक रहस्यमय चित्र दिसेल, ओळखा पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:18 PM2022-02-14T16:18:34+5:302022-02-14T18:59:13+5:30

या चित्रांमधील काहीतरी शोधण्याची मजाच काही और असते. आपण गंमत म्हणून या चित्रांकडे निरखुन पाहतो अन् काही क्षणांत आपल्याला खरं चित्र दिसतं.

What is hidden in this skull? In this human skull you will see a mysterious picture, let's see | Optical Illusion: या कवटीमध्ये दडलंय काय? या मानवी कवटीमध्ये तुम्हाला एक रहस्यमय चित्र दिसेल, ओळखा पाहू

Optical Illusion: या कवटीमध्ये दडलंय काय? या मानवी कवटीमध्ये तुम्हाला एक रहस्यमय चित्र दिसेल, ओळखा पाहू

Next

काहीवेळा आपण जे पाहतो ते नेमकं तसं असतंच असं नाही. काहीवेळा आपली नजर आपल्याला फसवू शकते. अशी काही चित्रे असतात ज्यात जे दिसतं त्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी वेगळं असतं. या चित्रांमधील काहीतरी शोधण्याची मजाच काही और असते. आपण गंमत म्हणून या चित्रांकडे निरखुन पाहतो अन् काही क्षणांत आपल्याला खरं चित्र दिसतं.

असाच एक ह्युमन ऑप्लिटकल इल्युजन (Human Optical illusion) फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात तुम्हाला एक मानवी कवटी दिसेल पण त्यात दडलेलं चित्र शोधणं म्हणजे खरं चॅलेंज. मग तुम्ही या चॅलेंजसाठी तयार आहात का? अमेरिकेची नॅशनल इंस्टिट्युट ऑफ एन्व्हॉरमेंटल हेल्थ सायन्स (National Institute of Enviromental Health Sciences) या संस्थेने एनव्हायर्मेंटंल किड्स हेल्थ या त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक पोस्ट केली आहे. त्यामध्ये हा फोटो आहे.

हा फोटो वरकरणी मानवी कवटीचा दिसतो. पण प्रत्यक्षात त्यात एक महिला आरशासमोर बसलेली आहे. ती तिचा शृंगार करत आहे. महिलेचा मुळ चेहरा कवटीचा एक डोळा आहे तर दुसरा डोळा त्या महिलेची आरशातील प्रतिमा आहे.

मानवी नजरेचा हा सर्व खेळ आहे. त्यामध्ये आपण नीट निरखुन पाहिल्यावर आपल्याला सत्य काय आहे ते समजते. मग घ्या जाणून सत्य अन् जास्तीत जास्त जणांना ही बातमी फॉरवर्ड करुन हे चॅलेंज द्या.

Web Title: What is hidden in this skull? In this human skull you will see a mysterious picture, let's see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.