खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हालाही नसेल माहीत उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:51 PM2024-07-06T13:51:58+5:302024-07-06T13:52:54+5:30
English Meaning Of Khichdi : तुम्ही कधी विचार केलाय का की, खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्ही अनेकदा खिचडी खाल्ली असेल, पण तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल.
English Meaning Of Khichdi : भारतात खिचडी कुणी खाल्ली नाही असं क्वचितच कुणी असेल. खिचडी भारतातील जास्तीत जास्त घरांमध्ये खाल्ली जाते. डाळ आणि तांदळाची खिचडी टेस्टी तर लागतेच सोबतच हेल्दीही असते. लोक खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कुणी तिखट करतात तर कुणी फिक्की. खिचडी हा शब्द मराठी आणि हिंदीत जवळपास सारखाच वापरला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्ही अनेकदा खिचडी खाल्ली असेल, पण तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल.
खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात?
सोशल मीडियावर असे वेगवेगळे प्रश्न नेहमीच विचारले जात असतात. त्यावर लोक उत्तरेही देत असतात. पण अनेकांना याचं उत्तर नक्कीच माहीत नसेल. पण आज या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खिचडीला इंग्रजीमध्ये hotchpotch असं म्हणतात.
फार जुना आहे इतिहास
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तुम्ही नेहमीच खात असलेल्या खिचडीचा इतिहास २५०० वर्षापेक्षा जुना आहे. तांदूळ आणि डाळ सोबत शिजवून खिचडी तयार केली जाते. यात काही लोक भाज्या किंवा मसाले टाकतात. खिचडी मुघल काळापासून बनवली जाते. यादरम्यान खिचडी इतकी फेमस झाली की, याचा समावेश शाही भोजनाच्या लिस्टमध्ये करण्यात आला.
लगेच तयार होणारं जेवण
खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि डाळ धुवून पाण्यात भिजवली जाते. नंतर एकत्र कुकरमध्ये टाकून शिजवली जाते. यात मसाले कमीच असतात, पण हळद, मीठ हे टाकलं जातं. सामान्यपणे खिचडी लगेच तयार होते आणि पौष्टिक असते.
पचनास हलकी
खिचडीमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पचनासंबंधी समस्या असेल तर याने लगेच दूर होते. शक्ती मिळवण्यासाठीही खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पोट खराब असेल तर मूगाच्या डाळीची खिचडी खाल्ली जाते. खिचडीचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात.