किम जोंग उनचा 'प्लेजर स्क्वाड', ज्यात दरवर्षी 25 तरूणींची होते निवड; पळून आलेल्या तरूणीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:17 AM2024-05-03T11:17:17+5:302024-05-03T11:17:53+5:30
येओनमीने दावा केला की, एकदा तरूणींची निवड झाल्यावर त्या व्हर्जिन आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांची मेडिकल टेस्ट केली जाते.
किम जोंग उन (Kim Jong Un) बाबत वेळोवेळी वेगवेगळे खुलासे होत असतात. उत्तर कोरियातून पळून आलेली तरूणी येओनमी पार्कने किम जोंग उनबाबत आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. मिररच्या एका रिपोर्टनुसार, पार्कने दावा केला आहे की, किम जोंग उन दरवर्षी 25 कुमारीका तरूणींना आपल्या प्लेजर स्क्वाडसाठी निवडतो. ही निवड तरूणींचं दिसणं आणि राजकीय निष्ठेवर आधारित असते. तिने खुलासा केला की, किमच्या प्लेजर स्क्वाडसाठी दोनदा तिला राखीव ठेवण्यात आलं होतं. पण तिच्या कौंटुबिक स्थितीमुळे तिची निवड झाली नव्हती.
येओनमी पार्कने सांगितलं की, किम शाळेत जातात आणि त्यांना एखादी सुंदर मुलगी दिसली तर आधी ते तिच्या परिवाराची स्थिती आणि राजकीय स्थितीची माहिती मिळवतात. ते अशा तरूणींची निवड करत नाहीत ज्यांच्या परिवारातील सदस्य उत्तर कोरियातून पळून गेले किंवा ज्यांचे नातेवाईक दक्षिण कोरिया किंवा इतर देशांमध्ये आहेत.
आधी होते मेडिकल टेस्ट
येओनमीने दावा केला की, एकदा तरूणींची निवड झाल्यावर त्या व्हर्जिन आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांची मेडिकल टेस्ट केली जाते. त्यांच्या शरीरावर एखादी बारीक खूणही असेल तर त्यांची निवड रोखली जाते. टेस्टनंतर पूर्ण उत्तर कोरियातून केवळ मोजक्याच तरूणींना प्योंगयांगला पाठवलं जातं. इथे एकमेव उद्देश असतो तो म्हणजे हुकूमशहाच्या ईच्छा पूर्ण करणं.
काय करावे लागतात कामे?
प्लेजर स्क्वाडला तीन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलं जातं. ज्यात एका ग्रुपला मालिश शिकवली जाते आणि दुसऱ्या ग्रुपला डान्स आणि गाणं शिकवलं जातं तर तिसऱ्या ग्रुपला हुकूमशहा आणि इतर अधिकारी पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतात.
पार्कने सांगितलं की, तिसऱ्या ग्रुपच्या तरूणींना हुकूमशहा आणि इतर पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतात. त्यांना शिकवलं जातं की, या पुरूषांना कसं आनंदी ठेवायचं, हे त्यांचं मुख्य काम असतं.
सगळ्यात आकर्षक तरूणींची निवड हुकूमशहाच्या सेवेसाठी निवडलं जातं. तेच इतर काही तरूणींना सैन्य अधिकारी आणि राजकीय नेत्यांना खूश करायचं असतं. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, एकदा जर टीममधील सदस्य 20व्या वर्षाच्या मध्यात पोहोचतात तेव्हा त्यांचा कार्यकाळ संपवला जातो. त्यातील बऱ्याच तरूणींचं लग्न नेत्यांच्या बॉडीगार्डसोबत होतं.
किम जोंग-उन च्या वडिलांनी केली होती सुरूवात
पार्कने सांगितलं की, या प्लेजर स्क्वाडची सुरवात 1970 च्या दशकात किम जोंग उनचे वडील जोंग-द्वितीय यांच्या शासन काळात झाली होती. 2011 मध्ये त्यांचं निधन झालं होतं.