लंडन शहरात भेंडी किती रूपये किलो मिळते? भाव वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 02:50 PM2024-06-26T14:50:19+5:302024-06-26T14:51:00+5:30

आज आम्ही तुम्हाला लंडनमध्ये भेंडी आणि इतर भारतीय गोष्टींचे भाव किती आहेत ते सांगणार आहोत.

What is the lady finger rates in London, video will blow your mind | लंडन शहरात भेंडी किती रूपये किलो मिळते? भाव वाचून व्हाल अवाक्....

लंडन शहरात भेंडी किती रूपये किलो मिळते? भाव वाचून व्हाल अवाक्....

सध्या भारतात भाज्यांचे भाव आकाशाला भि़डले आहेत. सध्या बाजारात हिरव्या पालेभाज्या, भेंडी, टोमॅटो साधारण ८० ते १०० रूपये किलो आहेत. त्यामुळे हैराण झाले आहेत. अशात लंडनमध्ये या भाज्यांचे काय भाव असतील? असाही एक प्रश्न समोर येतो. आज आम्ही तुम्हाला लंडनमध्ये भेंडी आणि इतर भारतीय गोष्टींचे भाव किती आहेत ते सांगणार आहोत.

सध्या लंडनमधील भाज्या आणि फूड्सच्या भावांची चर्चा होत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सध्या लंडनमध्ये भेंडी ६५० रूपये किलो विकली जात आहे. लंडनमधील एक भारतीय तरूणी छवी अग्रवालने फूड्सच्या रेटचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, छवी सुपर मार्केटमध्ये जाते आणि एक-एक करून भारतीय फूड्सच्या किंमती सांगत आहे. 

या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, भारतात २० रूपयांना मिळणारं चिप्सचं पॅकेट लंडनमध्ये ९५ रूपयांना आहे. तेच मॅगीचं पॅकेट ३०० रूपयांना मिळतं. त्याशिवाय पनीरचं पॅकेट ७०० रूपये, एक किलो भेंडी ६५० रूपये, कारले १००० रूपये विकले जात आहेत. तर हापूस आंबे २४०० रूपयांना विकले जात आहेत.

त्याशिवाय गुड डे बिस्कीट १०० रूपयाला म्हणजे भारतापेक्षा दहा पट जास्त किंमत आहे. लिटिल हार्ट बिस्कीट पॅकेट १०० रूपयांना मिळतं. लंडनमध्ये भारतीय फूड्सची किंमत साधारण दहा पटीने जास्त आहे. 

Web Title: What is the lady finger rates in London, video will blow your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.