रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:20 AM2023-09-15T10:20:04+5:302023-09-15T10:20:36+5:30
तुम्ही कधीना कधी रेल्वे रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ...
जास्तीत जास्त लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. पण तरीही रेल्वेबाबत अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात. रेल्वेने करताना तुम्ही अनेकदा स्टेशनवर किंवा रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळे कोड्स पाहिले असतील. या सगळ्यांना काहीना काही अर्थ असतो. पण ते क्वचितच लोकांना माहीत असतात. रेल्वेची बरीच कामे अशा कोड्सच्या माध्यमातून चालतात. आज अशाच एका कोडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कधीना कधी रेल्वे रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ...
रेल्वेमध्ये बरीचशी कामे संकेतांच्या माध्यमातून होतात. त्यामुळेच अनेक ठिकाणी साइन बोर्ड्स लावलेले असतात. यात बरीच महत्वाची माहिती दडलेली असते. असाच एक साइन बोर्ड म्हणजे W/L आणि सी/फा. पिवळ्या रंगाचे हे बोर्ड सहजपणे तुम्ही बघू शकता. याचा अर्थ विसल लाँग आणि शिटी फास्ट असा होतो. म्हणजे शिटी वाजवणे. हे बोर्ड रेल्वे क्रॉसिंगसाठी शिटी सूचक आहेत.
बोर्डवर इंग्रजीमध्ये W/L आणि हिंदीत सी/फा असं लिहिलेलं असतं. बोर्ड ट्रेनच्या ड्रायव्हरला हा संकेत देतात की, पुढे रेल्वे फाटक आहे. अशात तुम्ही रेल्वेची शिटी वाजवत फाटक पार करा. हे रेल्वे क्रॉसिंगच्या 250 मीटर आधी लावलेले असतात. त्यासोबतच W/B बोर्ड रेल्वेच्या ड्रायव्हरला हा संकेत देतो की, पुढे पूल येणार आहे. अशात पूल पार करताना शिटी वाजवावी.