काय आहे सर आणि मॅडम शब्दांचा अर्थ, कुठून आले हे शब्द? तुम्हालाही नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:29 PM2024-04-10T13:29:39+5:302024-04-10T13:30:34+5:30
Knowledge : फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या शब्दांचा वापर का केला जातो. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Knowledge : शाळा, कॉलजे, ऑफिस किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर सामान्यपणे सगळेच समोरच्या व्यक्तींना सर किंवा मॅडम असे म्हणतात. ही एक पद्धत झाली आहे. बालपणापासून हे शब्द आपण ऐकलेले असतात. इतका की, कुणी अनोळखी समोर आला तरी हे शब्द आपण वापरतो. पण असे फार कमी लोक आहेत जे हा विचार करत असतील की, या शब्दांचा अर्थ काय आहे? त्यापेक्षाही कमी लोकांना हे माहीत असेल की, या शब्दांचा वापर का केला जातो. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'सर' शब्दाची उत्पत्ती?
सर शब्द सन्माननिय व्यक्तींच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या आधी वापरला जातो. जसे की, हिंदीमध्ये श्री आणि श्रीमती. अशात अनेकदा असा प्रश्न पडतो की, हा शब्द आला कुठून? हा शब्द फ्रान्सीसी 'सायर' शब्दातून आला आहे. ज्याचा वापर एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी केला जात होता. सर राजकीय आणि कूटनीतिक कारणांसाठी दिली जाणारी एक उपाधी होती. जी इंग्रजांच्या काळात काही भारतीयांना दिली जात होती.
मॅडम शब्द कुठून आला?
सर शब्दाप्रमाणेच महिलांना सन्मान देण्यासाठी मॅडम हा शब्द वापरला जातो. कोलिन्स डिक्शनरीनुसार, मॅडम शब्द 'माय डेम' शब्दातून आला. डेम शब्दाची उत्पत्ती लॅडिन डोमिनामधून झाली होती. जे डोमिनसचं स्त्रीलिंगी रूप आहे. ज्याचा अर्थ होतो लॉर्ड किंवा मास्टर. पण आता डेम शब्दाला आक्षेपार्ह मानलं जातं. एकेकाळी डेम शब्दाचा वापर विवाहित महिला किंवा एखाद्या जबाबदार पदावर असलेल्या महिलेसाठी वापरला जात होता. आता त्याजागी मॅडम असा शब्द वापरला जातो.