Wikipedia मधील Wiki चा अर्थ काय आहे? 99 टक्के लोकांना नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:24 PM2024-01-17T14:24:06+5:302024-01-17T14:24:53+5:30
विकीपीडियावर तुम्ही रोज वेगवेगळी माहिती शोधत असता. पण विकीपीडियातील 'विकी' शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
अनेकदा अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा आपण रोज वापर करतो, पण आपल्याला माहीत नसतं की, त्यांचा अर्थ काय होतो? इंटरनेट विश्वातील कितीतरी गोष्टींचा आपण रोज वापर करतो, पण त्यांबाबत आपल्याला पूर्ण माहीत नसतं. अशीच एक बाब म्हणजे विकिपीडिया. विकीपीडियावर तुम्ही रोज वेगवेगळी माहिती शोधत असता. पण विकीपीडियातील 'विकी' शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
15 जानेवारी 2002 मध्ये Wikipedia हे सर्च इंजिन आपल्या आयुष्यात आलं. तेव्हापासून जेव्हाही आपल्या काही माहिती हवी असेल तर याचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, यातील 'विकी'चा अर्थ काय होतो? असे बरेच लोक असतील ज्यांना याचा अर्थ माहीत नसेल.
Wikipedia मधील Wiki काय आहे?
आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, विकीपीडिया एक फ्री ऑनलाईन एनसाइक्लोपीडिया आहे. ज्यावर सगळी माहिती मिळते. जे लोक याचा वापर करतात त्यांना हे माहीत नसतं की, ते यावरील माहिती एडिटही करू शकतात. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म रेडिटवर लोकांनी विचारलं की, Wikipedia मधील Wiki चा अर्थ काय होतो?
जाणून घ्या याचा अर्थ
स्वत: विकीपीडियाने सांगितलं की, त्यांचं हे नाव wiki आणि encyclopedia सोबत मिळतं जुळतं आहे. यात wiki अर्थ वेगवान किंवा फार लवकर असा होतो. हवाईवन भाषेत wiki चा अर्थ quick असा होतो. अशात विकीपीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे लगेच तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकते. विकीपीडियाने आतापर्यंत 62 मिलियन म्हणजे 6.2 कोटींपेक्षा जास्त आर्टिकल्स पब्लिश केले आहेत. जे 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये आहेत.