रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:18 AM2024-06-08T11:18:20+5:302024-06-08T11:19:34+5:30
तुम्ही रेल्वेच्या डब्यांवरील वेगवेगळे आकडे आणि साइन्स बघितले असतील. पण अनेकांना यांचा अर्थ काय आहे माहीत नसतो.
देशातील लाखो लोक रोज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक, स्वस्त आणि सोयीस्कर ठरतो. रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळे अनुभव येतात. वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तुम्हीही कधीना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. यावेळी तुम्ही रेल्वेच्या डब्यांवरील वेगवेगळे आकडे आणि साइन्स बघितले असतील. पण अनेकांना यांचा अर्थ काय आहे माहीत नसतो.
रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळे कोड्स किंवा साइन असतात. हे कोड्स किंवा साइन प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेले असतात. पण अनेकांना त्याचा अर्थच माहीत नसतो. असाच एक साइन म्हणजे रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे X हे साइन असतं. अनेकदा तुम्हीही हे साइन पाहिलं असेल. आज या साइनचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
railmitra.com या रेल्वेसंबंधी माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, भारतात चालणाऱ्या काही खास रेल्वेंच्या मागेच असा साइन असतो. पॅसेंजर रेल्वेंच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणं गरजेचं आहे.
हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही रेल्वे डब्यांवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच रेल्वेच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो.
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो.
प्रत्येक रेल्वेच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, रेल्वे आपातकालीन स्थितीत आहे.
प्रत्येक ट्रेनच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपातकालिन स्थितीत आहे.
हा लाइट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाइटने मागून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा इशारा मिळतो.