लग्नानंतर इथे पाळली जाते अजब प्रथा, नवरदेव नवरीच्या गाउनमध्ये शिरतो आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:07 PM2024-09-26T15:07:38+5:302024-09-26T15:09:22+5:30

Weird tradition : ही प्रथा फारच अजब होती. या प्रथेत लग्नानंतर अविवाहित पाहुणे नवरीच्या गाउनचा एक तुकडा मिळवण्यासाठी उतावळे राहत होते.

What is wedding garter tradition and its history of the garter toss | लग्नानंतर इथे पाळली जाते अजब प्रथा, नवरदेव नवरीच्या गाउनमध्ये शिरतो आणि...

लग्नानंतर इथे पाळली जाते अजब प्रथा, नवरदेव नवरीच्या गाउनमध्ये शिरतो आणि...

Weird tradition : वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळ्या मान्यता असतात. वेगवेगळ्या परंपरा लोक हजारो वर्षांपासून फॉलो करतात. आज आम्ही तुम्हाला लग्नातील एका अशा प्रथेबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल. ही प्रथा फारच अजब होती. या प्रथेत लग्नानंतर अविवाहित पाहुणे नवरीच्या गाउनचा एक तुकडा मिळवण्यासाठी उतावळे राहत होते. असं मानलं जात होतं की, नवरीच्या ड्रेसचा एक तुकडा ज्याला मिळतो, त्याचं जीवन भाग्यशाली असतं. 

काळानुसार या परंपरेमध्ये थोडा बदल झाला आहे. आता नवरीच्या ड्रेसमध्ये एक खास कपडा जोडला जाऊ लागला. ज्याला गार्टर म्हटलं जातं. लग्नानंतर नवरदेव हा गार्टर काढून पाहुण्यांकडे फेकतो. हा गार्टर म्हणजे एक पट्टीसारखा कापड असतो. जो नवरीच्या पायावर लावलेला असतो. हा कपडा ज्याला मिळेल त्याचं लग्न लवकर होतं असं मानलं जातं.

आज सुद्धा ही प्रथा मुख्यपणे पाश्चिमात्या देशांमध्ये प्रचलित आहे. खासकरून यूरोप आणि अमेरिकेत. पारंपारिक ख्रिश्चन लग्नांमध्ये ही प्रथा पार पाडली जाते. आता ही प्रथा एक फॅशन स्टेटमेंट म्हणून राहिली आहे. अशात आज आम्ही या प्रथेमागची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. 

कुठून आली ही परंपरा?

मध्यकालीन यूरोपमध्ये लग्नाच्या रात्रीला खास महत्व असतं. इथे लग्न केवळ समारंभानंतर नाही तर नवदाम्पत्याच्याच्या शारीरिक संबंधानंतर पूर्ण झाल्याचं मानलं जातं. लग्नात सहभागी पाहुण्यांना हा विश्वास देण्याची प्रथा होती की, लग्न पूर्ण झालं आहे. नवरदेव लग्नाच्या रात्री नवरीच्या कपड्याचा एक तुकडा, खासकरून गार्टर काढून लग्नात सहभागी पाहुण्यांवर फेकत असेल. हा याचाही इशारा असायचा की, लग्न पूर्ण झालं आहे.

काळानुसार प्रथेत बदल

आधुनिक काळासोबत ही प्रथा बदलत गेली. लग्नात गार्टर फेकण्याच्या प्रथेला गंमत आणि मनोरंजनाचं भाग बनवण्यात आलं. आता नवरदेव नवरीच्या पायावरील गार्टर काढून आपल्या अविवाहित मित्रांवर फेकतो. जो मुलगा याला पकडतो, त्याचं लग्न लवकर होईल असं मानलं जातं.
 

Web Title: What is wedding garter tradition and its history of the garter toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.