सोफ्यामध्ये दडलंय काय?
By admin | Published: March 26, 2017 12:31 AM2017-03-26T00:31:57+5:302017-03-26T00:31:57+5:30
तीन विद्यार्थ्यांना एका सोफ्याने चक्क लखपती बनविले. या विद्यार्थ्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता
न्यूयॉर्कमधील : तीन विद्यार्थ्यांना एका सोफ्याने चक्क लखपती बनविले. या विद्यार्थ्यांनी न्यूयॉर्कमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी त्यांनी सेकंड हँड फर्निचर खरेदी केले. यात एका सोफ्याचाही समावेश होता. एके दिवशी हे तीन विद्यार्थी रिसे वेरखोवै, कॉली गास्टी आणि लारा रुसो या सोफ्यावर बसले असता त्यांना यात काहीतरी असल्याची जाणीव झाली. त्यांनी सोफ्याची गादी काढली तेव्हा त्यात ४६ हजार रुपये असलेला लिफाफा सापडला मग त्यांनी सोफ्याच्या सर्व गाद्या त्यांनी काढून बघितल्या तेव्हा त्यांना आणखी लिफाफे आढळले. यात एकूण २६ लाख रुपये त्यांना मिळाले. ही रक्कम सोफ्याच्या मूळ मालकाला द्यायचे त्यांनी ठरविले. ज्या दुकानातून त्यांनी सोफा घेतला तिथे ते गेले तेव्हा त्यांना असे समजले की, हा सोफा एका वृद्ध महिलेचा होता. त्या महिलेचा मुलगा आणि सुनेने नव्या फर्निचरच्या बदल्यात हा सोफा येथे दिला होता. याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की, या महिलेच्या पतीचा ३० वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तो दर आठवड्यात काही पैसे देत होता. ते पैसे ही महिला पाकिटात ठेवून ते या सोफ्यात ठेवत होती. हे पैसे मिळाल्याने या महिलेला अतिशय आनंद झाला आणि तिने या विद्यार्थ्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून दिली.