रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या 'या' ५ आकडी क्रमांकाचा अर्थ काय असतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 03:35 PM2019-09-20T15:35:44+5:302019-09-20T15:44:19+5:30
तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. प्रवासादरम्यान तुम्ही कधी लक्ष दिलं असेल रेल्वेच्या डब्यांवर ५ आकडी क्रमांक लिहिलेला असतो.
(Image Credit : engineeringinsider.org)
तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. प्रवासादरम्यान तुम्ही कधी लक्ष दिलं असेल रेल्वेच्या डब्यांवर ५ आकडी क्रमांक लिहिलेला असतो. पण हा क्रमांक पाहून कधी प्रश्न पडलाय का की, या क्रमांकाचा अर्थ काय आहे? तुम्ही कधी या क्रमांकाबाबत विचार केलाय का? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो..
रेल्वेच्या डब्यावर मुख्य रूपाने ५ आकडी क्रमांक लिहिलेला असतो. याच्या सुरूवातीच्या २ आकड्यांवरून या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष कळून येतं.
(Image Credit : aanavandi.com)
उदाहरणार्थ जसे की, ०३२३० चा अर्थ होतो 2003 मध्ये निर्मित कोच, ०७०५२ चा अर्थ होतो २००७ मध्ये निर्मित कोच, किंवा ९७१३२ चा अर्थ होतो १९९७ मध्ये निर्मित कोच.
(Image Credit : travelkhana.com)
आता तुम्ही विचार करत असाल की, सुरूवातीच्या दोन आकड्यांबाबत तर सांगितलं. आता उरलेल्या तीन क्रमांकाच काय अर्थ आहे? चला जाणून घेऊ पुढच्या तीन क्रमांकाचा अर्थ काय आहे.
००१ - ०२५ : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष २०००/२००१ मधील काही डबे किंवा कोच
०२६ - ०५० : 1 AC + एसी - २ टी
०५१ - १०० : AC - 2T म्हणजे एसी २ टीअर
१०१ - १५० : AC - 3T म्हणजे एसी ३ टीअर
१५१ - २०० : CC म्हणजे एसी चेअर कार
२०१ - ४०० : SL म्हणजे द्वितीय श्रेणी स्लीपर
४०१ - ६०० : GS म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी
६०१ - ७०० : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सिटींग/जनशताब्दी चेअर कार
७०१ - ८०० : SLR सिटींग कम लगेच रॅक
८०१+ : पॅंटी कार, वीपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी....
ज्या रेल्वेचा पहिला नंबर ० ने सुरू होतो, ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी किंवा उत्सवात चालतात. तेच एसी रेल्वेंबाबत सांगायचं तर त्यांची सुरूवात १ नंबरने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्याऐवजी नंबर २ असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.