उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो व्हॉट्सअॅप करा आणि मिळवा 100 रुपये
By Admin | Published: March 21, 2016 11:10 AM2016-03-21T11:10:37+5:302016-03-21T11:10:37+5:30
मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो काढून व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
>भोपाळ, दि. २१ - मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणा-यांचा फोटो काढून व्हॉट्सअॅप करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकच नाही तर फोटो पाठवणा-यांना जो दंड वसूल केला जाईल त्याच्यातील 100 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले असून 15 ऑगस्टपर्यंत संपुर्ण जिल्हा यापासून मुक्त करण्याचा प्रशासनचा प्रयत्न आहे.
सध्या फक्त 20 ग्रामपंचायतींमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंचायतींना उघड्यावर शौच करणा-यांना दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच जो कोणी याची माहिती देईल त्याला 100रुपये बक्षीस देण्याचेही आदेश दिले आहेत. ग्रामविकास मंत्री गोपाळ भार्गवा यांनी उघड्यावर शौच करणा-यांचं रेशन कार्ड रद्द केली जाईल अशी घोषणा काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणी किती दंड घ्यायचा हे आम्ही ग्रामपंचायतींवर सोपवलं आहे. मात्र जो कोणी पंचायतीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून माहिती पुरवेल त्याला 100 रुपये बक्षीस देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जिल्हा पंचायतीचे अधिकारी निलेश पारीख यांनी दिली आहे.