भारतातील एकुलता एक राजा ज्याला हिटलरने लक्झरी कार दिली होती गिफ्ट, आता कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:25 PM2023-06-15T12:25:01+5:302023-06-15T12:27:15+5:30

Maharaja Bhupinder Singh of Patiala : पटियालाचे महाराज भूपिंदर सिंह इंग्रजांच्या जवळ होते आणि त्यांची हिटलरसोबतही भेट झाली होती. इतकंच नाही तर हिटलर या महाराजांवर इतके खूश झाले की, हिटलरने त्यांना एक कार गिफ्ट केली.

When Adlof Hitler given gift high class car to this Indian Maharaj | भारतातील एकुलता एक राजा ज्याला हिटलरने लक्झरी कार दिली होती गिफ्ट, आता कुठे आहे?

भारतातील एकुलता एक राजा ज्याला हिटलरने लक्झरी कार दिली होती गिफ्ट, आता कुठे आहे?

googlenewsNext

Maharaja Bhupinder Singh of Patiala : भारताच्या इतिहासात अनेक राजांचे वेगवेगळे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. यातील काही राजे आपल्या श्रीमंतीसाठी आणि शौकांसाठी ओळखले जात होते. ब्रिटिशांचं राज्य असतानाही काही राजे आपली संस्थाने स्वतंत्र चालवत होते. या राजांकडे अमाप संपत्ती, सुंदर राण्या आणि शाही महाल होते. यात शाही लाइफस्टाईलसाठी पटियालाचे महाराज सगळ्यात वरच्या नंबरला होते. ते इंग्रजांच्या जवळ होते आणि त्यांची हिटलरसोबतही भेट झाली होती. इतकंच नाही तर हिटलर या महाराजांवर इतके खूश झाले की, हिटलरने त्यांना एक कार गिफ्ट केली.

मुघलांचं शासन नाकारत पटियाला स्टेटची स्थापना 1763 मध्ये बाबा अली सिंह यांनी केली होती. नंतर इंग्रजांच्या मदतीने आणि नंतर 1857 च्या क्रांति दरम्यान इंग्रजांची मदत केल्याने पटियाला राज्य फारच मजबूत झालं होतं. पटियाला राज्य शान देशातच नाही तर परदेशातही वाढली होती.

वडील महाराज रजिंदर सिंह यांच्या निधनानंतर 9 वर्षीय महाराज भूपिंदर सिंह यांच्या हाती गादी आली. त्यांनी पुढे 38 वर्षे राज्य केलं. भूपिंदर सिंह हे राजकीय दृष्टीने फार मजबूत राजा मानले जात होते. चेंबर ऑफ प्रिंसेसचे महत्वपूर्ण सदस्य असल्याने त्यांना परदेशात फार मान होता. इंग्लंड, स्पेन, स्वीडन, नॉर्वे आणि इतरही देशांमध्ये भूपिंदर सिंह यांचे मित्र होते. 

हिटलरची भेट आणि गिफ्ट मिळाली कार

1932 मध्ये महाराज भूपिंदर सिंह हे जर्मनीच्या दौऱ्यावर होते. हिटलर आणि महाराज भूपिंदर सिंह यांच्या भेटीबाबत त्यांचे नातू राजा मालविंदर सिंह हे सांगत होते. याचा उल्लेख शारदा द्विवेदी यांचं पुस्तक Automobiles of the Maharajas मध्येही आहे.

मालविंदर सिंह सांगतात की, जर्मनीला पोहोचलेल्या आजोबांनी हिटलर यांना भेटीसाठी एक वेळ मागितली होती. पण त्यांनी खूप टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी 5 ते 10 मिनिटे वेळ दिला. पण नंतर गप्पांमध्ये असे रमले की, ते एक तासापेक्षा जास्त सोबत बसले. 

त्यानंतर दोघे लागोपाठ तीन दिवस भेटले. यादरम्यान हिटलरने महाराज भूपिंदर सिंह यांना अनेक गिफ्ट दिले. यात अनेक आधुनिक जर्मन हत्यार जसे की, लिग्नोस, वेल्थर आणि लगर ब्रांडच्या पिस्तुलांचा समावेश होता. त्यात सगळ्यात खास गिफ्ट होतं चमकदार मेबेच कार.

या आलिशान कारचे तेव्हा केवळ 6 मॉडल तयार करण्यात आले होते. या लांबलचक कारमध्ये 5 इंजिन होते. ज्यामुळे तिच्या बोनटचा आकार मोठा होता. या कारमध्ये पाच लोक बसू शकत होते. इतकंच नाही तर या कारची सीट फोल्डही होत होती. ही कार जर्मनीहून जहाजाने भारतात आणण्यात आली आणि महाराज भूपिंदर सिंह यांच्या मोती महाल पॅलेसमध्ये इतर कारसोबत उभी करण्यात आली.

जेव्हा ही कार पटियालामध्ये आली तोपर्यंत महाराजांचं निधन झालं होतं. त्यांचा मुलगा महाराज यादवेंद्र सिंह यांनी कार रजिस्टर केली. जिच्या नंबर प्लेटवर 7 लिहिलं होतं. नंतर ही कार अमेरिकेतील एका प्रायवेट संग्रहकर्त्याने 5 मिलियन डॉलर पेक्षाही जास्त किंमतीत खरेदी केली. हे इथंच थांबलं नाह. 2015 मध्ये ही कार एका दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केली. पण त्याची ओळख आणि किंमत लपवण्यात आली.

Web Title: When Adlof Hitler given gift high class car to this Indian Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.