कधी आणि कसा सुरू झाला टूथब्रशचा वापर, जाणून घ्या याच्या शोधाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:30 PM2021-07-05T15:30:30+5:302021-07-05T15:31:37+5:30

जगातला पहिला टूथब्रश कसा होता? याचा वापर पहिल्यांदा कुणी आणि केव्हा वापरला होता? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

When and Who invented the world's first toothbrush? Know about toothbrush | कधी आणि कसा सुरू झाला टूथब्रशचा वापर, जाणून घ्या याच्या शोधाची कहाणी

कधी आणि कसा सुरू झाला टूथब्रशचा वापर, जाणून घ्या याच्या शोधाची कहाणी

googlenewsNext

रोज सकाळी उठून आपण आपले दात स्वच्छ करतो. टूथब्रश आपल्या डेली लाइफचा महत्वाचा भाग झाला आहे. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आलाय का की, पहिल्यांदा टूथब्रश कधी तयार करण्यात आला होता? मनुष्याने टूथब्रशचा शोध कसा लावला? जगातला पहिला टूथब्रश (Tooth Brush History) कसा होता? याचा वापर पहिल्यांदा कुणी आणि केव्हा वापरला होता? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

१९५० च्या आसपास ड्यूपॉन्ट डी नेमोर्सने नायलॉन ब्रिस्टल टूथब्रश तयार केला. विलियम व्दारे तयार करण्यात आलेल्या टूथब्रशमध्ये डुकारांऐवजी घोड्यांच्या केसांचा वापर केला जात होता.

चीनने जगाला टूथब्रश ६०० वर्षाआधी दिला होता. इतिहासकारांनुसार, २६ जून १४९८ या दिवशी पहिल्यांदा चीन शासक होंगझी याने टूथब्रशचा वापर केला होता. याआधी लोक दात स्वच्छ करण्यासाठी राखेचा, कोळशाचा किंवा मंजनाचा वापर करत होते. 

जगातला पहिला टूथब्रश डुकरांच्या केसांपासून तयार केला गेला होता. ब्रिसल्स असलेले टूथब्रश मुळात कठोर असायचे. यासाठी वापरले जणारे केस डुकरांच्या माने मागचे जाड केस असायचे.

डुकरांचे हे केस बांबदूच्या एका काठीवर बांधून टूथब्रश तयार केले जात होते. १९३८ पर्यंत डुकरांच्या केसांपासून तयार केलेले टूथब्रश वापरले जात होते.

आधुनिक युगात टूथब्रशचा आविष्कार इंग्लंडचा एक कौदी विलियम एडीजने १७८० मध्ये केला होता. विलियमने सुद्धा डुकरांच्या केसांपासूनच टूथब्रश तयार केला होता. त्यानंतर मात्र, वेळोवेळ टूथब्रशमध्ये बदल झाले. 
 

Web Title: When and Who invented the world's first toothbrush? Know about toothbrush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.