वाह, कुत्र्याची कमाल! ९० किमी प्रवास करुन अखेर आपल्या जुन्या मालकाचं घर शोधलंच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:56 AM2020-07-20T11:56:03+5:302020-07-20T12:01:47+5:30

न्या मालकाकडे परतण्यासाठी कुत्र्याने तब्बल  ९० किमीचा प्रवास केला आहे.

When dog makes 90 km journey to her old home in lawson | वाह, कुत्र्याची कमाल! ९० किमी प्रवास करुन अखेर आपल्या जुन्या मालकाचं घर शोधलंच

वाह, कुत्र्याची कमाल! ९० किमी प्रवास करुन अखेर आपल्या जुन्या मालकाचं घर शोधलंच

Next

सध्या प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  गेल्या  काही दिवसात मंगोलियातील एका ऊंटाने आपल्या जुन्या मालकाला शोधण्यासाठी १०० किलोमीटरचा प्रवास केला होता. आता अशीच  घटना ताजी असताना आता कुत्र्यानेही कसरत करत अखेर आपल्या मालकांच घरं गाठलं आहे. कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र असून इमानी आहे. अशा अनेक प्रकारे कुत्राचं वर्णन करता येऊ शकतं.  आपल्याला ज्याप्रमाणे पाळीव प्राण्यांचा लळा लागतो. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही आपल्या मालकाचा लळा लागलेला असतो. 

अमेरिकेतील कान्सास या ठिकाणी एक कुत्रा बेपत्ता झाला होता. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर दिसून आले की हा कुत्रा आपल्या जुन्या मालकाच्या घरी पोहोचला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण जुन्या मालकाकडे परतण्यासाठी कुत्र्याने तब्बल  ९० किमीचा प्रवास केला आहे. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मायकल आणि ब्रिटनी यांनी पाहिले की त्यांच्या घराबाहेर एक लॅब्रोडॉग बसला आहे. हा एक मादा कुत्रा ( कुत्री)  आहे. आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले अरे, हा कुत्रा कुठून आला.

जेव्हा मायकलने क्लियोची मायक्रोचीप चेक केली तेव्हा दिसून आले की, हा त्यांच्यासोबत राहत असलेला कुत्रा आहे. या कुत्र्याच्या मालकाने सोशल मीडियावर कुत्रा बेपत्ता असल्याची माहितीसुद्धा दिली होती. या कुत्र्यांचं नाव क्लोयो आहे. मायकलचे क्लियोवर खूप प्रेम आहे. विशेष म्हणजे ९० किलोमीटरचं अंतरपार करून हा कुत्रा परत कसा आला. याबाबत विचार करत आहे. कोणी अनोळखी व्यक्तीने या कुत्र्याला या ठिकाणी आणून सोडलं असावं असं मत मायकलचं आहे. 

उद्योगपतीला सापडला दुर्मिळ कासव, याला मानलं जातं गुडलक चार्म!

शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

Web Title: When dog makes 90 km journey to her old home in lawson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.