उंदरांचा हैदोस! महिला झोपेतून उठली तेव्हा उंदीर कुरतडत होता तिचा डोळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 05:49 PM2021-07-06T17:49:06+5:302021-07-06T17:49:48+5:30

गेल्या ९ महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांचं हैदोस सुरूच आहे. हॉस्पिटल, शाळा, लोकांच्या घरात उंदरांचे कारनामे बघता येतात.

When mouse eats Women's eyeball in Australia | उंदरांचा हैदोस! महिला झोपेतून उठली तेव्हा उंदीर कुरतडत होता तिचा डोळा...

उंदरांचा हैदोस! महिला झोपेतून उठली तेव्हा उंदीर कुरतडत होता तिचा डोळा...

Next

जेव्हा संपूर्ण जग कोरोनासोबत लढाई लढत होतं, तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये लोकांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली.  या देशात उंदरांचं थैमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. इतकंच काय तर उंदरं लोकांच्या घरात हजारोंच्या संख्येने आहेत. लोकांच्या शेतांमध्ये उंदरं आहेत. इतकंच नाही तर उंदरांनी आता मनुष्यांवर हल्लेही सुरू केले आहेत. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियात एका महिले यामुळे दाखल करावं लागलं कारण ती झोपेलेली असताना उंदराने तिचा डोळा कुरतडला होता. न्यू साउथ वेल्स भागातील ही घटना गेल्या महिन्यात घडली होती.. महिलेची झोप अचानक रात्री उघडली तर तिला दिसलं की, उंदीर तिचा डोळा कुरतडत होता. त्यानंतर तिला पती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

गेल्या ९ महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांचं हैदोस सुरूच आहे. हॉस्पिटल, शाळा, लोकांच्या घरात उंदरांचे कारनामे बघता येतात. शेतकऱ्यांची लाखो रूपयांचं पिकही उंदरांनी बेकार केलं आहे. Mick Harris व्यवसायाने शेतकरी आहे. त्याने द टाइम्सला सांगितलं की, त्याला असं वाटत होतं की, जणू एखादी वस्तू त्याच्या कानावर चालत आहे. उंदराने त्याचा कान खाल्ला होता. तेव्हा तो झोपेत होता आणि अचानक बेडवरून उठला.

तज्ज्ञांनुसार, ऑस्ट्रेलियातमध्ये गेल्या ३० वर्षात उंदरांचा असा प्रकोप कधी बघायला मिळाला नाही. असं होत आहे कारण उंदरांची ब्रीडिंग  सायकल छोटी असते. ऑस्ट्रेलियातील हेल्थ विभागाने सांगितलं की, मनुष्यांनंतर उंदरंच हे सर्वात सक्सेसफुल स्तनधारी आहेत. एक उंदीर दोन ते तीन वर्षे जगू शकतो. मादा सहा महिन्यानंतर रिप्रॉडक्शन करण्यात सक्षम असते.
 

Web Title: When mouse eats Women's eyeball in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.