तिसरं महायुद्ध कुठून सुरू होणार? ChatGPTची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 6 ठिकानांची नावंही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 05:55 PM2024-01-27T17:55:37+5:302024-01-27T17:56:54+5:30

ChatGPT ने अशा 6 ठिकानांची नावं सांगितली आहेत, जेथून तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.

Where will the third world war start ChatGPT's Scary Prediction, predicted six hotspots | तिसरं महायुद्ध कुठून सुरू होणार? ChatGPTची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 6 ठिकानांची नावंही सांगितली

तिसरं महायुद्ध कुठून सुरू होणार? ChatGPTची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 6 ठिकानांची नावंही सांगितली

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात युद्ध भडकल्यानंतर, तिसरे महायुद्ध होते की काय? या भीतीने संपूर्ण जग धास्तावले होते. मात्र कदाचित अमेरिका आणि खाडी देशांच्या समजूतदारपणामुळे तसे घडले नाही. मात्र आर्टिफ‍िशिअल इंटेल‍िजन्सच्या (AI) जगात सर्वशक्तिमान मानले जाणारे एआय बॉट चॅटजीपीटीने जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. ChatGPT ने अशा 6 ठिकानांची नावं सांगितली आहेत, जेथून तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटिश सेन्याचे प्रमुख जनरल स्टाफ पॅट्रिक सँडर्स आणि नाटो जनरल यांनी आपल्या नागर‍िकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले होते. तेव्हा लष्कर प्रमुखांनी म्हटले होते, "नागरिकांनी शस्त्र उचलण्यासाठी सज्ज असायला हवे. कारण जेव्हा युद्धाला तोंड फुटेल, तेव्हा कदाचित रिझर्व्ह फोर्सदेखील पुरेसा नसेल." त्यांच्या या वक्तव्याने जगाला धडकी भरली होती. तेव्हा, अमेर‍िका आणि नाटो देश तिसऱ्या महायुद्धाची तयार करत आहेत की काय? असे वाटत होते. 

यातच, ChatGPT ला तिसऱ्या महायुद्धाच्या संभाव्य ठिकानांसंदर्भात विचारले असता, त्याने 6 हॉटस्‍पॉट सांगितले. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही 6 ठिकाणं तिसऱ्या महायुद्धाची केंद्र स्थानं ठरू शकतात आणि जगाला कुठल्याही क्षणी आगीत ढकलू शकतात.

ही आहेत 6 केंद्रस्थानं... -
1. कोरियन द्वीपकल्प
2. मध्य पूर्व
3. तैवान सामुद्रधुनी
4. पूर्व युरोप
5. दक्षिण चीन समुद्र
6. भारत-पाकिस्तान सीमा

Web Title: Where will the third world war start ChatGPT's Scary Prediction, predicted six hotspots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.