'इथे' आहे विमानांची जगातली सर्वात मोठी स्मशानभूमी, काय केलं जात इथे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:47 PM2019-12-26T14:47:29+5:302019-12-26T14:55:31+5:30

तुम्ही कधी विमानाच्या स्मशानभूमीबाबत ऐकलंय का? कदाचित नसेल ऐकलं. पण आज आम्ही तुम्हाला विमानांच्या स्मशानभूमीबाबत सांगणार आहोत.

Where is the world's biggest aircraft Cemetery? | 'इथे' आहे विमानांची जगातली सर्वात मोठी स्मशानभूमी, काय केलं जात इथे?

'इथे' आहे विमानांची जगातली सर्वात मोठी स्मशानभूमी, काय केलं जात इथे?

Next

(Image Credit : independent.co.uk)

जगभरात आता विमानांची आणि विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. विमानाने प्रवास करणं आता सहज शक्य झालं आहे. लोकांना एअरपोर्ट असो वा विमान दोन्ही गोष्टींबद्दल कुतूहल असतं. पण तुम्ही कधी विमानाच्या स्मशानभूमीबाबत ऐकलंय का? कदाचित नसेल ऐकलं. पण आज आम्ही तुम्हाला विमानांच्या स्मशानभूमीबाबत सांगणार आहोत.

जगातली विमानांची सर्वात मोठी स्मशानभूमी अमेरिकेत आहे. एरिजोनाच्या टक्सन वाळवंटात ही स्मशानभूमी २६०० एकर परिसरात पसरलेली आहे. हा आकार फुटबॉलच्या १३०० मैदाना इतका मोठा आहे. इथे हजारोंच्या संख्येने कितीतरी जुनी लढाऊ विमाने ठेवली आहेत.

(Image Credit : independent.co.uk)

'बोनयार्ड' नावाने लोकप्रिय असलेल्या या ठिकाणाला विमानाची स्मशानभूमी म्हणून ओळखलं जातं. बोनयार्डमध्ये कार्गो लिफ्टरपासून ते बॉम्ब टाकणारे विमान, ए १० थंडरबोल्ट्स, हर्कुलस फायटर्स आणि एफ-१४ टॉमकॅट फायटर्स अशी इतरही विमाने आहेत.

(Image Credit : independent.co.uk)

अमेरिकेतील ३०९वा एअरोस्पेस मेन्टनेन्स अ‍ॅन्ड रिजनरेशन ग्रुप इथे पोहोचणाऱ्या विमानाची दुरूस्ती करतात आणि काही विमानांना उडण्यासाठी तयार करतात. मायक्रोसॉफ्टने सॅटेलाइटच्या माध्यमातून काही फोटो जारी केले होते. यात बोनयार्डचे तीन भाग विस्तार रूपाने दाखवण्यात आले होते.

(Image Credit : independent.co.uk)

२००५ मध्ये जेव्हा सॅटेलाइट इमेजरी सॉफ्टवेअर लॉन्च झाला, तेव्हापासून गुगल अर्थ यूजरसाठी हे ठिकाण उत्सुकता वाढवणारं ठरलं. आता तर सॅटेलाइटच्या माध्यमातून येथील फोटो आणखी स्पष्ट बघता येऊ शकतात.

(Image Credit : independent.co.uk)

एरिजोनामध्ये असलेल्या डेविस मान्थन एअरफोर्स बेसमध्ये ३५ बिलियन डॉलर(२१५७ अब्ज रूपये)ची जुनी विमानांची चांगले पार्ट्स व्यवस्थित ठेवले जातात.

(Image Credit : artificialowl.net)

हे ठिकाण साधारण ४, ४०० एअरक्राफ्टचं घर आहे. तेच स्टीलच्या साडे तीन लाख वस्तू देखील इथे आहेत. अमेरिकेने दुसऱ्या देशांना देखील येथील जुने पार्ट्स खरेदी करण्याची सूट दिली आहे.


Web Title: Where is the world's biggest aircraft Cemetery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.