जर मनुष्यांचं अस्तित्व संपलं तर पृथ्वीवर राज्य करणार 'हा' समुद्री जीव, वैज्ञानिकांचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:10 AM2024-11-29T11:10:35+5:302024-11-29T14:43:05+5:30

मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्यांचं अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा कोणत्या जीवाचं राज्य असेल?

Which creature could take over earth if humanity disappears scientists answer | जर मनुष्यांचं अस्तित्व संपलं तर पृथ्वीवर राज्य करणार 'हा' समुद्री जीव, वैज्ञानिकांचा दावा!

जर मनुष्यांचं अस्तित्व संपलं तर पृथ्वीवर राज्य करणार 'हा' समुद्री जीव, वैज्ञानिकांचा दावा!

Humanity Disappears From Earth: पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव आणि प्राणी राहतात. मनुष्य हे पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानले जातात. वैज्ञानिक नेहमीच असा दावा करतात की, कधी ना कधी पृथ्वीचा नाश होईल आणि पृथ्वीवरून मनुष्य लुप्त होतील. अशात अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्यांचं अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा कोणत्या जीवाचं राज्य असेल? या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकांनी दिलं आहे. 

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, मानवी अस्तित्व नष्ट झाल्यावर किंवा संपल्यावर पृथ्वीवर ऑक्टोपस राज्य करतील. वैज्ञानिकांनुसार, ऑक्टोपस जीव बुद्धिमान असण्यासोबतच टॅलेंटेडही आहेत. असं सांगण्यात आलं आहे की, पाण्यात राहणारा हा जीव पृथ्वीवर राज्य करण्यासाठी पूर्णपणे फीट आहे. कारण त्यात समस्या सोडवण्याची, शिकण्याची क्षमता जास्त आहे. हेच कारण आहे की, हे जीव इतर जीवांपेक्षा वेगळे आहेत.

ऑक्टोपसची खासियत

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टिम कॉलसन म्हणाले की, 'ऑक्टोपस सगळ्यात जास्त बुद्धिमान जीव आहे आणि त्यांच्यात एकमेकांसोबत कम्यूनिकेट करण्याची क्षमताही जास्त आहे. तसेच त्यांच्यात शिकण्याची ईच्छा जास्त आहे. इतकंच नाही तर ते आपल्या कामात निपुण असतात आणि त्यांच्या या खासियतमुळेच मनुष्यांचं अस्तित्व नष्ट झाल्यावर ते पृथ्वीवर राज्य करू शकतील'. 

प्रोफेसर पुढे म्हणाले की, 'ऑक्टोपस खऱ्या आणि व्हर्चुअल गोष्टींमध्ये अंतर करणे आणि कोडी सोडवण्यातही चांगले आहेत. ते आपल्या पर्यावरणासोबत फीट बसतात आणि खोल समुद्रापासून ते जमिनीवरही काही वेळ राहू शकण्यास सक्षम असतात'. 

Web Title: Which creature could take over earth if humanity disappears scientists answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.