शरीरातील कोणता अवयव सहन करू शकत नाही जास्त उष्णता? वाचा काय होतात परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:02 PM2024-06-01T15:02:04+5:302024-06-01T15:02:34+5:30
तुम्हाला जर विचारलं की, शरीराच्या कोणत्या भागाला सगळ्यात जास्त उन्हाचा फटका बसतो? तर सामान्यपणे बरेच लोक त्वचा असं उत्तर देतील.
सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तापमान भयंकर वाढलेलं आहे. ज्यामुळे लोकांचं जगणं मुश्कील झालंय. लोक उष्माघाताने आणि उन्हामुळे होणाऱ्या अनेक समस्यांमुळे जीव गमावत आहेत. उन्हाळ्यात शरीराला चांगलाच फटका बसतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने गंभीर समस्या होतात. पण तुम्हाला जर विचारलं की, शरीराच्या कोणत्या भागाला सगळ्यात जास्त उन्हाचा फटका बसतो? तर सामान्यपणे बरेच लोक त्वचा असं उत्तर देतील. पण हे उत्तर चुकीचं आहे. याचं बरोबर उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही काळजी घेऊ शकाल.
दिल्ली आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमान 50 च्या वर गेलं आहे. ज्यामुळे लोकांचं घराबाहेर निघणं बंद झालंय. जेव्हा तापमान 48 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान पोहोचतं तेव्हा मानवी शरीरासाठी ते खूप जास्त धोकादायक असतं. मानवी शरीराचं तापमान सामान्यपणे 98.6 डिग्री फारेनहाइट असतं. हे 37 डिग्री सेल्सियसच्या बरोबरीत असतं. असं मानलं जातं की, मनुष्य जास्त जास्त 108.14 डिग्री फारेनहाइट किंवा 42.3 डिग्री सेल्सियस तापमानात जगू शकतात.
तापमानाचा कशावर जास्त प्रभाव?
48-50 डिग्री सेल्सियस तापमान मानवी शरीराला सोसणं अवघड असतं. मेंदू आणि तंत्रिका तंत्र 50 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात जास्त वेळ राहिल्याने मेंदुला फार जास्त नुकसान होतं. 46-60 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमान असल्यावर मेंदुतील कोशिका मरू लागतात. कारण कारण मेंदुच्या कोशिकांमध्ये प्रोटीन गोठणं सुरू होतं.
तापमान जास्त झाल्यावर मांसपेशींमध्ये समस्या सुरू होतात. शरीरातील पाणी कमी होणं आणि इलेक्ट्रोलाइटचं असंतुलन यामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. ज्यामुळे सोपी सोपी कामंही करता येत नाही. त्याशिवाय जास्त उष्णतेमुळे चट्टे पडतात आणि आतील रक्त बाहेर येऊ लागतं. त्वचेजवळच्या रक्त कोशिका फुटू शकतात.
ऑक्सीजन किंवा पोषक तत्व कमी असलेल्या भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. तेच श्वास घेण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं तर 50 डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमानात जास्त वेळ राहिल्याने थकवा, हीटस्ट्रोक आणि मृत्यूही होऊ शकतो.