शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:08 PM2024-05-28T14:08:10+5:302024-05-28T14:08:33+5:30
Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.
Knowledge : परंपरेनुसार मृत्यूनंतर व्यक्तीला अग्नी देऊन मुक्ती दिली जाते. मृत शरीराला अग्नी दिल्यावर काही तासांमध्ये शरीर जळून राख बनतं. यावेळी हाडेही राख बनतात. पण काही हाडे पूर्ण जळत नाहीत. नंतर या अस्थी नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. पण यावेळी शरीरातील एक असा भाग असतो जो या आगीत जळत नाही आणि राखही होत नाही. तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.
सामान्यपणे 670 ते 810 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमानात शरीर 10 मिनिटात वितळू लागतं. ते 20 मिनिटांनी हाडांपासून नरम टिश्यू निघून जातात. तर 30 मिनिटांमध्ये पूर्ण त्वचा जळून जाते. कवटीवर भेगा पडू लागतात. एका माहितीनुसार 40 मिनिटांनंतर शरीरातील आतील अवयव जळून स्पंजसारखे दिसू लागतात. 50 मिनिटांनी हात आणि पाय जळून जातात. त्यानंतर धड जळून राख होतं. मानवी शरीर पूर्ण जळण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ लागतो. पण त्यानंतरही एक भाग जळत नाही.
कोणते अवयव जळत नाहीत?
मृत्यूनंतर कुणाला अग्नी दिल्यावर पूर्ण शरीर जळून राख बनतं. पण फक्त दात जळत नाहीत. शरीर जळाल्यानंतर हा एक भाग जो तसाच राहतो. वैज्ञानिकांनुसार, दात न जळण्यामागे सायंटिफिक कारण आहे. दात हे कॅल्शिअम फॉस्फेटपासून बनलेले असतात आणि ते आगीत जळत नाही. अग्नी दिल्यावर दातांवरील नरम ऊती जळून जातात. तर सगळ्यात कठोर ऊती तशाच राहतात. ऊती म्हणजे अनेक कोशिकांपासून बनलेला समूह असतो.
काही हाडेही कमी तापमानावर पूर्ण जळून राख होत नाहीत. वैज्ञानिकांनुसार शरीरातील सगळी हाडे जाळण्यासाठी 1292 डिग्री फ़ारेनहाइट इतक्या उच्च तापमानाची गरज असते. इतक्या तापमानातही कॅल्शिअम फॉस्फेट पूर्णपणे जळून राख होत नाही.