भाजी कोणती बनवायची? 'जागतिक' प्रश्नावरून वाद झाला; पतीने असे काही केले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:27 PM2020-05-19T12:27:56+5:302020-05-19T12:41:36+5:30

साधारणपणे आदल्या दिवशीच याची तयारी सुरु होते. कडधान्ये मोड आणण्यासाठी भिजत घालायची, भाजी नीट करून ठेवायची अशी कामे स्वयंपाकघरात सुरु असतात. पण घरात दोनपेक्षा अधिक लोक असल्याने प्रत्येकाची आवड वेगळी असते.

Which vegetable to make ‘global’ question; husband hung on the balcony hrb | भाजी कोणती बनवायची? 'जागतिक' प्रश्नावरून वाद झाला; पतीने असे काही केले...

भाजी कोणती बनवायची? 'जागतिक' प्रश्नावरून वाद झाला; पतीने असे काही केले...

Next

एकतर लॉकडाऊन सुरु आहे, त्यातच घरात बसून बसून डोक्याचेही भजे झाले आहे. कोणी पब्जी खेळतोय, तर कोणी फेसबुक-व्हॉट्सअॅप, युट्यूबवर टाईमपास करतोय. अनेकांनी तर आज हे बनवले, उद्या ते बनवले याचे स्टेटसही ठेवायला सुरवात केलीय. पण एवढ्या सगळ्या संकटात एक प्रश्न गंभीरच बनलेला आहे. आज भाजी कोणती बनवायची?


साधारणपणे आदल्या दिवशीच याची तयारी सुरु होते. कडधान्ये मोड आणण्यासाठी भिजत घालायची, भाजी नीट करून ठेवायची अशी कामे स्वयंपाकघरात सुरु असतात. पण घरात दोनपेक्षा अधिक लोक असल्याने प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यातच पती महाराज लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. 


पती घरात असल्याने आणि बाजारात मोजक्याच भाज्या उपलब्ध होत असल्याने घराघरात आज भाजी कोणती बनवायची यावरून विश्वयुद्धच होत आहे. कारण तसा पाहिला तर हा कळीचा आणि जागतिक मुद्दा आहे. असाच प्रकार गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडला आहे. 


अहमदाबादमध्ये एका सोसाटीतील घरामध्ये पती पत्नीमध्ये आज जेवणात कोणती भाजी बनवायची यावरून चर्चा सुरु होती. या चर्चेचे रुपांतर वादात झाले. पत्नीने मग भांड्यांची आदळआपट सुरु केली. झाडू फेकाफेकी असे काहीतरी झाले असेल. आता नवरोबांनी बचावाचा पवित्रा घेतला आणि थेट बाल्कनी गाठली. तेथून आत्महत्या करण्याचा विचार केला आणि उडी मारायला रेलिंगवर चढला, पण पाय घसरल्याने नंतर जिवाच्या आकांताने ओरडू लागला.


तोल गेल्याने घाबरला होता. यामुळे त्याने पटकन रेलिंगला पकडले मात्र, तोपर्यंत तो खूप खाली लटकला होता. अखेर लोकांनी त्याला समजावून आत्महत्या करू, नको. पकडून ठेव असे सांगितले. नंतर काही वेळातच शेजाऱ्यांनी जाऊन त्याला वर खेचले. 

महत्वाच्या बातम्या....

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

Web Title: Which vegetable to make ‘global’ question; husband hung on the balcony hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.