साफसफाई करताना हॉटेल कर्मचाऱ्याला सापडला मानवी शरीराचा 'असा' भाग; सर्वच हैराण झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:47 PM2022-03-22T16:47:50+5:302022-03-22T16:48:15+5:30
रेस्टॉरंटचे मालक एम्मा व्हेलन यांनी बिझनेसच्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर केला ज्यात एक बॅग दाखवली आहे
रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती अशी गोष्ट विसरला जी कुणीही विसरणार नाही. ब्रिटनच्या एका रेस्टॉरंटमध्ये घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिनरसाठी आलेल्या काही ग्राहकांपैकी एकाने त्याची वस्तू विसरला आणि हॉटेलमधून निघून गेला. पुढील दिवशी जेव्हा हॉटेल कर्मचारी रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता करत होता. तेव्हा त्याला ती वस्तू सापडली अन् मोठा धक्का बसला.
कर्मचाऱ्याने ती वस्तू सांभाळून ठेवली आणि तातडीने मॅनेजरला कळवलं. ब्रिटीश रेस्टॉरंटमध्ये लॉस्ट अँन्ड फाऊंड प्रॉपर्टी पाहणारा स्टाफ आता त्याच्या मालकाचा शोध घेत आहे. ज्याने त्याच्या दाताचा जबडा रेस्टॉरंटमध्येच विसरून गेला आहे. यूपीआय न्यूजनुसार, हे प्रकरण इंग्लंडच्या ओल्डम येथील रॉयटन बार्कले पिझ्झा एन्ड प्रोसेको येथील आहे. याठिकाणी हॉटेल व्यवस्थापकाचे कर्मचारी रविवारी सकाळी-सकाळी साफसफाई करत होते. जेव्हा त्यांनी जेवणाच्या टेबलावर खाली पडलेला दातांचा संच(Denture Set) पाहिला तेव्हा धक्का बसला.
हॉटेल मालकानं फेसबुकवर शेअर केले...
रेस्टॉरंटचे मालक एम्मा व्हेलन यांनी बिझनेसच्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर केला ज्यात एक बॅग दाखवली आहे. ज्यावर कर्मचाऱ्याने १९ मार्च २०२२ दात असे लेबल चिटकवले आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, बार्कले येथे एका रात्री आम्हाला अनेक सामान सापडलं. ज्यात घराची चावी, फोन, इतकेच नाही तर बूटही सापडले आहेत. परंतु यंदा काहीतरी नवीन पाहायला मिळालं.
दाताचा पूर्ण सेट डिनर पार्टीनंतर सापडला
व्हेलन यांनी सांगितले की, दातांचा पूर्ण सेट डिनर पार्टीनंतर आम्हाला सापडला आहे. त्यांनी मेनचेस्टर न्यूजला सांगितले की, शनिवारच्या रात्री आम्ही खूप व्यस्त होतो. आमच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. आम्हाला रात्रीपर्यंत काहीच सापडले नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल स्टाफ मेंबर साफसफाई करताना त्याला ही वस्तू आढळली. ती जमिनीवर पडली होती. हा दाताचा पूर्ण सेट होता. कुणीतरी याचा शोध घेत असावा म्हणून मी फेसबुकवर पोस्ट केल्याचं ते म्हणाले. मात्र या किस्स्याने सगळेच हैराण झाले आहेत.