आश्चर्य! एक असं फूल जे पाण्यात भिजताच होतं पारदर्शी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:22 PM2019-04-18T13:22:32+5:302019-04-18T13:25:49+5:30

निसर्गाच्या खजिन्यात अनेक सुंदर आणि अनमोल अशा गोष्टी दडलेल्या आहेत. यातीलच एक आहे डिपहिल्लेया ग्रे.

The white flower that becomes crystal clear in rains | आश्चर्य! एक असं फूल जे पाण्यात भिजताच होतं पारदर्शी!

आश्चर्य! एक असं फूल जे पाण्यात भिजताच होतं पारदर्शी!

Next

निसर्गाच्या खजिन्यात अनेक सुंदर आणि अनमोल अशा गोष्टी दडलेल्या आहेत. यातीलच एक आहे डिपहिल्लेया ग्रे. एक असं फूल जे दिसायला तर सामान्य आहे, पण त्याची एक वेगळी खासियतही आहे. हे फूल पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही की, यात काय वेगळेपण आहे. खरंतर हे सामान्य दिसणारं फूल पाण्याच्या संपर्कात येताच पारदर्शी होतं. 

काय आहे या फुलाचं नाव

जपानच्या डोंगराळ भागात आढळणाऱ्या या फुलाला 'स्केलेटन फ्लॉवर' असेही म्हणतात. हे फूल वसंत ऋतूमध्ये उमलतं. जेव्हा वातावरण कोरडं होतं तेव्हा हे फूल पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं दिसतं. पण पाऊस आला रे आला की, हे फूल पूर्णपणे पारदर्शी होतं. पाऊस थांबल्यावर फूलाच्या पाकळ्या सुकतात आणि पुन्हा पांढऱ्या दिसू लागतात. 

का होतं असं?

पाण्याच्या संपर्कात आल्यावर पांढरं फूल पारदर्शी दिसण्याच्या या क्षमतेचा रंकतेशी काहीही संबंध नाही. खरंतर फुलाच्या पाकळ्यांमध्ये सैल कोशिका संरचनेमुळे असं होतं. 

'केमिस्ट्री वर्ल्ड' च्या एका रिपोर्टनुसार, उन्हाच्या दिवसात पाकळ्यांचं एअर लिक्विड इंटरफेस डिफ्यूज रिफ्लेक्टेंसचं कारण ठरतं. जेव्हा पाकळ्यांवर पाणी पडतं तेव्हा हे एक वॉटर-इंटरफेस तयार करतं आणि प्रकाश याच्या आरपार होतो. यामुळे फूल पारदर्शी होतं. 

रंग बदलण्याच्या या क्षमतेमुळे 'स्केलेटन फ्लॉवर' ने अभ्यासकांसोबतच सामान्य लोकांनाही आकर्षित होतं. नॅनोफोटोनिक्स अभ्यासकांनी या फुलापासून प्रेरित होऊन पाण्याखाली एक पारदर्शी भाग विससित केला आहे. 

Web Title: The white flower that becomes crystal clear in rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.