Pata Seca ज्याने गुलामी दरम्यान आपल्या मालकासाठी जन्माला घातली 200 पेक्षा जास्त मुलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:00 PM2023-08-25T13:00:06+5:302023-08-25T13:02:25+5:30
Pata Seca : गुलामीसाठी सगळ्यात जास्त येथील लोकांची विक्री आणि खरेदी होत होती. जे लोक या गुलामांना खरेदी करत होते, ते त्यांच्याकडून कोणतीही कामे करू घेत होते.
Pata Seca : गुलामीचा काळ लोकांसाठी फारच वेदनादायी होता. गुलामांना जनावरांसारखं वागवलं जायचं. याचा मोठा इतिहास लिहिला गेला आहे. गुलामी जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघण्यात आली. मग तो भारत असो वा अमेरिका. पण गुलामी आफ्रिकन लोकांसाठी एका श्रापासारखी होती.
गुलामीसाठी सगळ्यात जास्त येथील लोकांची विक्री आणि खरेदी होत होती. जे लोक या गुलामांना खरेदी करत होते, ते त्यांच्याकडून कोणतीही कामे करू घेत होते. ज्यासाठी त्यांच्यावर अनेक अत्याचारही केले जात होते. आज आम्ही एका अशा गुलामाबाबत सांगणार आहोत, ज्याने गुलामीच्या काळात मालकासाठी साधारण 200 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला होता.
आम्ही ज्या गुलामाबाबत सांगत आहोत त्याचं नाव पाटा सेका (Pata Seca) होतं. त्याचं खरं काम आपल्या मालकासाठी मुलांना जन्म देणं होतं. पेटा सेकाचं खरं नाव Roque Jose Florencio होतं. पाटा सेका याला 19व्या शतकात आफ्रिकेच्या महाद्वीपामध्ये स्थित ब्राजील देशातील एका जमीनदाराने आपलं गुलाम बनवलं होतं. असं सांगण्यात येतं की, पाटा सेकाची उंची 7 फूट 2 इंच होती. तो शारीरिक रूपाने फार शक्तीशाली होता.
त्याच्याबाबत असंही सांगितलं जातं की, तो 130 वर्षे जगला होता. आपल्या या इतक्या आयुष्यात त्याने केवळ मालकाची गुलामी केली आणि गुलामी दरम्यान मुलांना जन्म दिला. याच कारणाने त्याला अजून एक नाव पडलं होतं ते म्हणजे 'ब्रीडर पेटा साका'.
गुलामीच्या काळात आफ्रिकन गुलामांची खरेदी-विक्री जगात जास्त होत होती. श्रीमंत लोक गुलाम विकत घेत होते आणि त्यांच्याकडून हवं ते काम करून घेत होते. गुलामांना खरेदी करताना त्यांची उंची आणि ताकद यानुसार त्यांची किंमत ठरत होती.
अशात पाटा सेका सुद्धा फार शक्तीशाली होता आणि त्याची उंचीही चांगली होती. पेटाचा मालक त्याला ब्रीडर नावाने हाक मारत होता. कारण पाटा द्वारे जन्माला घातलेली मुले शक्तीशाली व्हावी आणि त्याद्वारे त्याला पैसे कमावता यावेत. पाटाने गुलामी दरम्यान मालकासाठी 200 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला.