'इश्किया'तील 'इब्न बतूता...' हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच, आता हे जाणून घ्या कोण होता हा इब्न बतूता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:34 PM2021-12-02T13:34:02+5:302021-12-02T13:36:51+5:30

'इब्न बतूता, बगल में जूता, पहने तो करता है चुर्र...' या गाण्याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आजही अनेकांना हे गाणं आवडतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, हा इब्न बतूता (Ibn Battuta) कोण होता?

Who was ibn battuta? Know the interesting facts | 'इश्किया'तील 'इब्न बतूता...' हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच, आता हे जाणून घ्या कोण होता हा इब्न बतूता

'इश्किया'तील 'इब्न बतूता...' हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच, आता हे जाणून घ्या कोण होता हा इब्न बतूता

googlenewsNext

२०१० मध्ये अरशद वारसी,  नसीरूद्दीन शाह आणि विद्या बालनचा 'इश्किया' सिनेमा आला होता. या सिनेमातील एक गाणं फारच  फेमस झालं होतं. 'इब्न बतूता, बगल में जूता, पहने तो करता है चुर्र...' या गाण्याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आजही अनेकांना हे गाणं आवडतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, हा इब्न बतूता (Ibn Battuta) कोण होता? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो कोण होता हा इब्न बतूता...

ही गोष्ट आहे १४व्या शतकातील. १३०४ मध्ये मोरक्कोमध्ये एका इब्न बतूता नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला होता. तो एक मस्तमौला व्यक्ती होता. त्याला जगभरात फिरायची आवड होती. त्याला फिरायची इतकी आवड होती की, तो जगाच्या प्रवासावर निघाला. त्यावेळी लोक बाहेर फिरायला जाण्याच्या नावावर धार्मिक यात्राच करत होते. पण इब्न-ए-बतूता खरंच जगभरात फिरायला आणि जग समजून घ्यायला निघाला होता. तेही केवळ २१व्या वयात. तो एक इस्लामिक स्कॉलर होता. तो हज यात्रेकरूंसोबत फिरायला गेला. पण परत आला नाही. त्याने ठरवलं की, तो बाकीची दुनिया बघणार.

३० वर्ष केलं प्रवास

इब्न बतूताने आफ्रिका, आशिया आणि दक्षिण पूर्व यूरोपचा जास्तीत जास्त भाग पाहिला. आपल्या प्रवासादरम्यान तो उत्तर अमेरिका, इजिप्त, अरब, फारस, अफगानिस्तानलाही गेला होता. इतकंच काय तर तो हिमालय पार करत भारत, चीन, दक्षिण-पूर्व आशिया, मालदीव्सलाही गेला होता. 

१३३२ च्या शेवटी तो भारतात आला होता. त्यावेळी मुहम्मद बिन तुघलकाचं शासन होतं. त्याने इब्न बतूताचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. इब्न बतूता काही दिवस सुल्तानच्या दरबारात राहिला. त्याने तीस वर्षात जवळपास १ लाख २० हजार किलोमीटर प्रवास केला.

त्याच्या प्रवासाचं सगळं वर्णन 'रिहला' मध्ये वाचता येईल. ज्याचा अर्थ होतो सफरनामा. यात तुम्हाला त्या सर्व ठिकाणांबाबत, लाईफस्टाईलबाबत वाचायला मिळेल. या पुस्तकात याचाही उल्लेख आहे की, इब्न बतूताने त्याच्या या प्रवासादरम्यान साधारण १० लग्ने केली. आफ्रिका, यूरोप आणि आशियात त्याला मुलंही झालीत.

इब्न बतूता आपल्या देशात म्हणजे मोरक्कोत कधी परतला  याबाबत वाद आहेत. पण असं मानलं जातं की, तो १३४९ मध्ये आपल्या देशात पोहोचला होता. आपल्या घरापासून तो बराच काळ दूर होता. तो पोहोचण्यााच्या काही महिन्यांआधीच त्याच्या  आईचं निधन झालं होतं. तर साधारण १५ वर्षाआधी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं.
 

Web Title: Who was ibn battuta? Know the interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.