जगातले जास्तीत जास्त लोक ७ नंबरला लकी मानतात, तुम्हाला माहीत आहे का कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:19 PM2021-09-20T15:19:55+5:302021-09-20T15:26:16+5:30
७ या अंकाला पूर्णतेची जाणीव मानली जाते. जो बायबलमधून आला आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात ७ स्वर्ग आहेत.
जर तुम्ही कुणाला १ ते १० नंबरमधील एक नंबर निवडायला सांगाल तर जास्तीत जास्त लोक ७ हा नंबर निवडतात. पण यात असं काय आहे? सात नंबरला सगळे लोक लकी नंबर का मानतात? जगात सात आश्चर्ये आहेत. आठवड्यात ७ दिवस आणि इंद्रधनुष्यात रंगही सात आहेत. जगभरात ७ नंबरला लकी नंबर मानलं जातं. चला जाणून घेऊ यामागचं लॉजिक.
गणितज्ज्ञांनुसार, ९ नंबरच्या अनेक विशेषता आहेत ज्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. १, २, ३, ४ आणि ५ या अंकांना डबल करून तुम्ही २, ४, ६, ८, ९ आणि १० मिळवू शकता. पण ७ चे डबल केले तर समूहा बाहेरचा अंक मिळतो. (हे पण वाचा : भारतीय कैद्यांना पांढऱ्या-काळ्या रंगाचेच कपडे का दिले जातात, जाणून घ्या इंटरेस्टींग कारण...)
७ या अंकाला जगभराती वेगवेगळ्या धर्मात फारच महत्वपूर्ण स्थान आहे. अशी मान्यता आहे की, सातव्या मुलाच्या सातव्या मुलाला इश्वार जादुई शक्ती देतो. त्या वाईट आणि चांगल्या दोन्हीही असू शकतात. बायबलच्या विद्वानांचा दावा आहे की, देवाने ६ दिवसात विश्वाचं निर्माण केलं होतं आणि ७व्या दिवशी आराम. (हे पण वाचा : कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते?)
अशाप्रकारे ७ या अंकाला पूर्णतेची जाणीव मानली जाते. जो बायबलमधून आला आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात ७ स्वर्ग आहेत. मुस्लिम लोक मक्का येथे काबाला ७ फेऱ्या मारतात. वेदांनुसार, १४ लोक आहे ज्यातील ७ उच्च आणि ७ पाताळ लोक आहेत. बौद्ध धर्मानुसार, भगवान बुद्ध हे जन्माला आल्यावर ७ पावलं चालले होते. या अशा मान्यतांमुळेच ७ अंक हा लोकांसाठी लकी मानला जातो.