प्लेनमध्ये एअर होस्टेस कधी पित नाही चहा आणि कॉफी, कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:16 PM2022-07-15T14:16:34+5:302022-07-15T14:18:15+5:30
Secrets of Airlines: फ्लाइटमधील हे सीक्रेट एअर होस्टेस सिएरा मिस्टने सांगितलं. सिएरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिला टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत.
Secrets of Airlines: तुम्ही कधी विमानात प्रवास केला तर चहा किंवा कॉफी तर प्यायली असेलच. पण तुम्ही कधी फ्लाइटमध्ये कॅबिन क्रू आणि एअर होस्टेसला उड्डाणादरम्यान चहा किंवा कॉफी पिताना पाहिलं का? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, क्रू मेंबर्स कधीही फ्लाइटमध्ये चहा किंवा कॉफी पित नाहीत. यामागचं कारण जाणून घेतल्यावर तुम्ही यापुढे फ्लाइटमध्ये चहा किंवा कॉफी ऑर्डर करण्याआधी अनेकदा विचार कराल.
फ्लाइटमधील हे सीक्रेट एअर होस्टेस सिएरा मिस्टने सांगितलं. सिएरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिला टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच फ्लाइटमधील तिच्या कामाबाबत माहीत शेअर करत असते. सध्या तिचा एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात तिने फ्लाइट अंटेडेंट आणि पायलटचे सीक्रेट सांगितले.
फ्लाइटमध्ये चहा-कॉफी पित नाही क्रू मेंबर्स
सिएट मिस्टने व्हिडीओत सांगितलं की, क्रू मेंबर्स फ्लाइटमध्ये लागलेल्या पाण्याच्या टाकीचा वापर करणं टाळतात. तिने लिहिलं की, 'मी तुम्हाला फ्लाइट अटेडंटचे काही सीक्रेट सांगणार आहे. मी पैज लावते की, तुम्हाला याबाबत माहीत नसेल'. तिने सांगितलं की, जोपर्यंत फार गरजेचं होत नाही तोपर्यंत आम्ही लोक फ्लाइटमध्ये चहा-कॉफी पित नाही. कारण जे पाणी आम्ही चहा-कॉफी बनवण्यासाठी वापरतो ते प्लेनच्या त्या टॅंकमधून येतं जी कधीही साफ केली जात नाही. सिएराने पुढे सांगितलं की, एअरलाइन्स कंपन्या वेळोवेळी पाण्याची टेस्ट नक्की करतात. पण जर पाण्यात काही सापडलं नाही तर टॅंकची सफाई करत नाही.
प्रवासादरम्यान सनस्क्रीन
सिएराने फ्लाइटमधील आणखी एक सीक्रेट सांगितलं. तिने सांगितलं की, एअर होस्टेस नेहमीच उड्डाणा दरम्यान सनस्क्रीन लावतात. यामागचं कारणही सिएराने सांगितलं. तिने सांगितलं की, आम्ही असं करतो कारण आम्ही रोज जमिनीपासून 35 हजार फूट उंचीवर फ्लाइटमध्ये प्रवास करतो. फ्लाइट ओझोन लेअरच्या फार जवळून उडते. अशात ओझोन रेडिएशनचा धोका फार जास्त असतो. हेल्थ इन्शुरन्स कंपन्या क्रू मेंबर्सना अॅस्ट्रोनॉट आणि रेडिओलॉजिस्टच्या श्रेणीत ठेवतात.