...म्हणून केवळ हिरव्या आणि ब्राउन रंगाच्या बॉटलमध्ये मिळते Beer, इंटरेस्टींग आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:42 PM2022-02-17T13:42:00+5:302022-02-17T13:44:11+5:30

Beer Bottle Colour : तुम्ही कधी लक्ष दिलं असेल किंवा नसेल पण बीअरची बॉटल नेहमी हिरव्या रंगाची किंवा ब्राउन रंगाची असते. या दोन रंगाच्या बॉटलशिवाय कोणत्याच रंगाच्या बॉटलमध्ये बीअर मिळत नाही.

Why are beer bottles only green and brown? Know the reason | ...म्हणून केवळ हिरव्या आणि ब्राउन रंगाच्या बॉटलमध्ये मिळते Beer, इंटरेस्टींग आहे कारण!

...म्हणून केवळ हिरव्या आणि ब्राउन रंगाच्या बॉटलमध्ये मिळते Beer, इंटरेस्टींग आहे कारण!

googlenewsNext

Beer Bottle Colour : बीअर ही जगातल्या सर्वात लोकप्रिय पेयापैकी एक आहे. जगातील सर्वात जास्त जुन्या पेय पदार्थांमध्ये पहिल्या स्थानावर पाणी, दुसरा चहा आणि तिसरी बीअर आहे. एका जुन्या आकडेवारीनुसार, जगभरात मोठ्या प्रमाणात बीअर सेवन केली जाते. पण अर्थातच अल्कोहोलने आरोग्याला अनेक नुकसान होतात. आम्ही तुम्हाला काही बीअरचे किंवा नुकसान सांगणार नाही आहोत. आम्ही यासंबंधी एक वेगळी इंटरेस्टींग माहिती सांगणार आहोत. 

तुम्ही कधी लक्ष दिलं का?

तुम्ही कधी लक्ष दिलं असेल किंवा नसेल पण बीअरची बॉटल नेहमी हिरव्या रंगाची किंवा ब्राउन रंगाची असते. या दोन रंगाच्या बॉटलशिवाय कोणत्याच रंगाच्या बॉटलमध्ये बीअर मिळत नाही. पण अनेकांना याचं कारण माहीत नसेल किंवा अनेकांनी कधी याचा विचारच केला नसेल. पण याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार  आहे.

जास्तीत जास्त लोकांना बॉटलच्या रंगापेक्षा बॉटलमध्ये जे आहे त्यात जास्त इंटरेस्ट असतो. ते बाकी कोणत्या गोष्टींचा विचार करत नाहीत. पण आम्ही तुम्हाला याचं कारण सांगतो. असं सांगितलं जातं की, मनुष्य प्राचीन काळापासून मसोपोटामियाच्या सुमेरियन संस्कृतीपासूनचं बीअरचं सेवन करतात.

पांढऱ्या बॉटलमध्ये खराब होत होती बीअर

असं मानलं जातं की, हजारो वर्षांआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये सुरू झाली होती. तेव्हा बीअरची पॅकिंग ट्रान्सपरन्ट बॉटलमध्ये केली जात होती. असं आढळून आलं आहे की, पांढऱ्या बॉटलमध्ये  बीअर पॅक केल्याने बीअरचं अॅसिड सूर्यकिरणातून निघणाऱे अल्ट्रा वॉयलेट रेज खराब करत आहेत. त्यामुळे बीअरची दुर्गंधी येत होती आणि लोक ते पिऊ शकत नव्हते.

कंपनीने काढला फॉर्म्यूला

बीअर तयार करणाऱ्या या कंपनीने ही समस्या दूर करण्यासाठी एक प्लान तयार केला. या प्लाननुसार, बीअरसाठी भुरक्या रंगाचा थर असलेल्या बॉटल निवडल्या गेल्या. हा प्लान यशस्वी झाला. या रंगाच्या बॉटलमधील बीअर खराब झाली नाही. कारण सूर्य किरणांचा प्रभाव बॉटलवर किंवा बॉटलच्या आतील बीअरवर झाला नाही.

हिरव्या बॉटल कशा निवडल्या?

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान भुरक्या रंगाच्या बॉटलचा शॉर्टेज आला होता. या रंगाच्या बॉटल्स कुठेच मिळत नव्हत्या. अशात बीअर निर्मात्यांनी एक असा रंग निवडला ज्यावर सूर्य किरणांचा प्रभाव होत नव्हता. तेव्हा भुरक्या रंगाऐवजी हिरव्या रंगाची बॉटल निवडण्यात आली. तेव्हापासून हिरव्या रंगाच्या बॉटलमध्ये बीअर येऊ लागली.
 

Web Title: Why are beer bottles only green and brown? Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.