विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 10:29 AM2023-10-06T10:29:11+5:302023-10-06T10:30:11+5:30

Interesting Facts : एका यूजरने विचारलं की, विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Why are chickens thrown at the airplane engine know reason | विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? जाणून घ्या कारण...

विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Interesting Facts : बऱ्याच लोकांनी कधीना कधी विमानातून प्रवास केला असेल. पण विमानासंबंधी अनेक गोष्टी लोकांना माहीत नसतात आणि जेव्हा एखादी गोष्ट समोर येते तेव्हा अवाक् होतात. असाच प्रश्न सोशल मीडिया साइट कोरावर (Quora) चर्चेचा विषय बनला आहे. यावर एका यूजरने विचारलं की, विमानाच्या इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात? चला जाणून घेऊ यामागचं कारण...

विमानाच्या इंजिनावर मेलेल्या कोंडब्या फेकण्यामागे एक खास कारण असतं. असं यासाठी केलं जातं जेणेकरून विमानाचं इंजिन टेस्ट करता यावं. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, एखादा पक्षी विमानाच्या फ्लाय विंग्सला धडकला. अशात काहीतरी दुर्घटना होण्याचा धोका अधिक असतो. फ्लाइट क्रॅश होऊन हजारो प्रवाशांचा जीवही जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी इंजिन टेस्ट केलं जातं. 

कधी नकली पक्षी वापरतात तर कधी मेलेल्या कोंबड्या

एविएशन एक्‍सपर्टनुसार, जेव्हाही विमान आकाशात उड्डाण घेत असतं तेव्हा या गोष्टीची नेहमीच भिती असते की, एखादा पक्षी येऊन धडकेल. याने विमानाला नुकसान पोहोचण्याची भिती असते. अशात विमान निर्माता कंपन्या कोंबड्या इंजिनावर फेकून टेस्ट करतात. याला “बर्ड कॅनन” म्हटलं जातं. अनेकदा यासाठी नकली पक्षीही वापरले जातात किंवा मेलेल्या कोंबड्या. यासाठी 2 ते 4 किलो चिकनचा वापर केला जातो.

कधी झाला पहिला प्रयोग 

अनेक वर्षांपासून असं केलं जात आहे. सगळ्यात आधी 1950 मध्ये हर्टफोर्डशायरच्या डे हेविलॅंड एअरक्राफ्टमध्ये असं करण्यात आलं होतं. या कामात मेलेल्या कोंबड्यांचा वापर केला जातो आणि बघितलं जातं की, इंजिनमध्ये आग तर लागत नाहीये ना. त्यावेळी हा प्रयोग करण्यासाठी एक कोंबडी इंजिनवर फेकण्यात आली होती. प्रयोग यशस्वी ठरला आणि कोंबडी नुकसान न होता फ्लायविंगमधून निघून गेली. पण आजकाल असं फार कमी केलं जातं किंवा अजिबातच केलं जात नाही. कारण इंजिन टेस्ट करण्याच्या इतरही आधुनिक पद्धती समोर आल्या आहेत.

Web Title: Why are chickens thrown at the airplane engine know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.