शर्टला डावीकडेच का असतो खिसा? जाणून घ्या काय आहे याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:57 AM2023-05-03T09:57:33+5:302023-05-03T09:57:49+5:30

Shirt Pocket Myth: काही शर्टला दोन्हीकडे खिसे असतात. पण जेव्हा एक खिसा असतो तेव्हा तो डावीकडेच असतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Why are the pockets on the left side of shirt, know the reason | शर्टला डावीकडेच का असतो खिसा? जाणून घ्या काय आहे याचं कारण...

शर्टला डावीकडेच का असतो खिसा? जाणून घ्या काय आहे याचं कारण...

googlenewsNext

Shirt Pocket Myth: तुम्हीही शर्ट घालता आणि शर्टच्या खिशात पेनही ठेवता किंवा फोन ठेवता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, शर्टचा खिसा हा नेहमी डावीकडेच का असतो. काही शर्टला दोन्हीकडे खिसे असतात. पण जेव्हा एक खिसा असतो तेव्हा तो डावीकडेच असतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

एक्सपर्ट्सनुसार, याची अनेक कारणे आहेत. पहिलं कारण हे सांगितलं जातं की, जास्तीत जास्त लोक राइट हॅंडर म्हणजे उजव्या हाताने सगळी कामे करतात. त्यांच्यासाठी डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताचा वापर करणं सोपं असतं आणि हाताची हालचाल कोणत्याही स्थितीत सोपी असते. त्यामुळे खिसा डावीकडे शिवला जातो.

एक दुसऱ्या रिपोर्टनुसार, पुरूषांचे शर्ट, ट्राउजर, जीन्स, लोअर, शॉर्ट्स आणि इतकंच काय तर टीशर्ट मध्येही खिसे शिवले जातात. पण महिलांच्या शर्टमध्ये आधी खिसे नसायचे. फार नंतर याचं चलन आलं. त्यांच्या कपड्यांना खिसे कमी असायचे. तुम्ही मुलींच्या जीन्स पाहिल्या असतील ज्यात खिसे नसतात. 

काही एक्सपर्ट्सचं मत आहे की, यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नाही. ही एक जुनी मान्यता आहे जी फार आधीपासून चालत आली आहे. फक्त यात सवयीची भावना लपली आहे. अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो की, महिलांच्या शर्टला खिसा का नसायचा? याचं उत्तर वेगवेगळं दिलं जात होतं. आता महिला आणि पुरूष दोन्हींच्या शर्टला खिसा असलण्याचं चलन आलं आहे.

Web Title: Why are the pockets on the left side of shirt, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.