जपानमध्ये ट्रॅफिक लाइट निळा का असतो? कारण वाचून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:51 PM2023-09-25T12:51:07+5:302023-09-25T12:52:07+5:30

Why are Traffic Lights Blue in Japan: जपानमध्ये सिग्नलवरून जाण्यासाठी हिरव्या नाही तर निळ्या रंगाचा वापर केला जातो. चला जाणून घेऊ याचं कारण...

Why are traffic lights blue in Japan? Because you will be surprised to read... | जपानमध्ये ट्रॅफिक लाइट निळा का असतो? कारण वाचून व्हाल हैराण...

जपानमध्ये ट्रॅफिक लाइट निळा का असतो? कारण वाचून व्हाल हैराण...

googlenewsNext

Why are Traffic Lights Blue in Japan:  भारताच्या ट्रॅफिक लाइटमध्ये तीन रंग असतात. लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंग असतात. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अशा ट्रॅफिक नियमांचं पालन केलं जातं. आपल्याकडे सिग्नलवरून जाण्यासाठी हिरव्या लाइटचा वापर केला जातो. पण जपानमध्ये सिग्नलवरून जाण्यासाठी हिरव्या नाही तर निळ्या रंगाचा वापर केला जातो. चला जाणून घेऊ याचं कारण...

जपान हा देश टेक्नॉलॉजीबाबत नेहमीच पुढे राहिला आहे. जपान जगातील टॉप तीन इकॉनॉमीमध्ये आहे. जपान आपल्या मेहनतीने एक विकसित देश आहे.

जपानमधील अनेक वस्तू जगभरातील देशांमध्ये वापरल्या जातात. जपानमध्ये ट्रॅफिक लाइटची सुरूवात 1930 दरम्यान सुरू झाली. पण अनेकांना प्रश्न पडतो की, जो देश टेक्नॉलॉजीमध्ये इतका पुढे असूनही ट्रॅफिक लाइटबाबत त्यांच्याकडून अशी चूक का झाली? 

फार पूर्वीपासून जपानमध्ये केवळ 4 प्रमुख रंग, काळा, पांढला, लाल आणि निळ्यासाठी शब्द बनले होते. इथे निळ्या रंगाला 'यलो' म्हटलं जातं. जर एखाद्या हिरव्या गोष्टीबाबत काही सांगायचं असेल तरीही 'यलो'च म्हटलं जात होतं. बऱ्याच वर्षानी इथे हिरव्या रंगासाठी मिडोरी शब्दाचा प्रयोग होऊ लागला. 

जपानमध्ये आधी सिग्नलसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, हिरव्या रंगाचीच निवड करण्यात आली होती. पण अधिकृत कागदपत्रांवर ट्रॅफिक लाइटच्या हिरव्या रंगाला मिडोरी न लिहिता यलो लिहिण्यात आलं. ज्याचा अर्थ होतो निळा.

सरकार हिरव्या रंगाला निवडत होती, पण जपानमधील लोक आणि जपानी भाषेचे जाणकार याच्या विरोधात होते. त्यांचं मत होतं की, जर जपानच्या नियमांमध्ये यलो रंगाचा वापर करायचा असेल तर त्यांनी तोच करावा. याच कारणाने जपानने 1968 मध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन रोड साइन अॅंन्ड सिग्नलच्या करारावर सही केली नव्हती. 

मग आंतरराष्ट्रीय दबाव आणि अंतर्गत विरोधाच्या दबावापासून वाचवण्यासाठी एक मधला मार्ग काढण्यात आला. 1973 मध्ये जपानी अधिकाऱ्यांनी एक Turquoise रंगाची लाइट निवडली. तेव्हा दावा करण्यात आला की, त्यांचा जो हिरवा रंग आहे तो हिरव्याचा सगळ्यात जास्त निळा शेड आहे. म्हणजे असा रंग जो हिरवा आहे पण निळा दिसतो. लोक आज बोलत असले की, जपानमध्ये ट्रॅफिक लाइटचा रंग निळा आहे. पण सरकार  हेच सांगते की, त्यांचा ट्रॅफिक लाइटचा रंग हिरवाच आहे. 

ट्रॅफिक लाइटचा इतिहास

जगात सगळ्यातआधी ट्रॅफिक लाइट्स 1868 मध्ये लंडनच्या ब्रिटिश हाऊस ऑफ पार्लमेंटसमोर लावण्यात आले होते. जे जे.पी.नाइट नावाच्या एका इंजिनिअरने इन्स्टॉल केले होते. 155 वर्षाआधी तेव्हा रात्री दिसण्यासाठी ट्रॅफिक लाइटमध्ये गॅसचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी फक्त  लाल आणि हिरव्या रंगाचाच वापर केला जात होता.

Web Title: Why are traffic lights blue in Japan? Because you will be surprised to read...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.