कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 01:44 PM2021-09-18T13:44:21+5:302021-09-18T13:45:53+5:30
हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती.
अल्कोहोलचा विषय आला तर जगभरात सर्वात जास्त बीअर हेच प्यायलं जाणारं ड्रिंक आहे. काही लोक पितात कारण त्यांना सवय असते तर काही लोक केवळ एन्जॉय करण्यासाठी पितात. पण दोन्ही प्रकारच्या लोकांनी बीअर पिताना याकडे लक्ष दिलं नसेल की, बीअर हिरव्या किंवा ब्राउन रंगाच्या बॉटलमध्येच का असते?
असं मानलं जातं की, हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती. यानंतर काही ब्रुअर्सच्या लक्षात आलं की, बीअर पांढऱ्या बॉटलमध्ये पॅक केल्याने त्यातील अॅसिड सूर्य किरणातील अल्ट्रा वॉयलेट रेंजने खराब होतं. ज्यामुळे बीअरची दुर्गंधी येऊ लागते आणि लोक बीअर पिणं टाळू लागले होते. ( हे पण वाचा : बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, शरीरात घुसताच व्यक्तीचा मृत्यू होतो?)
बीअर तयार करणाऱ्या कंपनीने ही समस्या दूर करण्यासाठी एक योजना बनवली. ज्यानुसार त्यांनी बीअरसाठी भुरक्या रंगाची बॉटल निवडली. त्यांचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि भुरक्या रंगाच्या बॉटलवर सूर्य किरणांचा काहीच प्रभाव पडत नाही. ज्यामुळे बीअरची टेस्ट आणि सुगंध दोन्ही चांगले राहत होते.
त्यासोबतच बीअरसाठी हिरव्या रंगाच्या बॉटलचा वापर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सुरू झाला. कारण तेव्हा भुरक्या रंगाच्या बॉटलचा तुटवडा जाणवू लागला होता. बीअर बनवणाऱ्या कंपनीने असा रंग निवडला होता, ज्यावर सूर्यकिरणांचा काही वाईट परिणाम होत नव्हता. त्यामुळे फार विचार करून बीअरसाठी हिरव्या किंवा भुरक्या रंगाची निवड केली गेली आहे.