भारतातील सर्व नद्यांना 'स्त्री' अन् ब्रम्हपुत्र नदीला 'पुरूष' का मानलं जातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:24 PM2021-04-17T13:24:33+5:302021-04-17T13:35:15+5:30
ब्रम्हपुत्रा ही अशी एकमेव नदी आहे ज्यासाठी पुल्लिंगाचा वापर केला जातो किंवा काही ठिकाणी नदी ऐवजी 'नद' असा वापर करतात, पण का?
(Image Credit : worldatlas.com)
भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक नद्या आहेत. तसेच भारतातील काही नद्या अधिक प्रसिद्ध आणि चर्चेचा विषय ठरत असतात. भारतात नद्यांची पूजा केली जाते. अनेक नद्यांना आई, देवी मानून पूजलं जातं. तसेच गंगा, यमुना इत्यादी नद्यांना स्त्रीलिंगी उच्चारलं जातं. मात्र, ब्रम्हपुत्रा ही अशी एकमेव नदी आहे ज्यासाठी पुल्लिंगाचा वापर केला जातो किंवा काही ठिकाणी नदी ऐवजी 'नद' असा वापर करतात, पण का?
जवळपास ३ हजार किलोमीटर लांब असलेली ही नदी आशियातील सर्वात सुंदर नद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम कैलाश पर्वतावरील मानसरोवरातून होतो. Quora वरील एका लेखानुसार, ब्रम्हपुत्र शब्दाचा अर्थ ब्रम्हाचा पूत्र. ब्रम्हपुत्राला देव मानून पूजलं जातं. देव म्हणून नाही. जय गंगा माता असा नारा दिला जातो. पण जय ब्रम्हपुत्रा माता असं कधी ऐकलं नसेल.
(Image Credit : en.wikipedia.org)
काय आहे याचं कारण?
Quora च्या एका यूजरनुसार, पश्चिमेकडे वाहणाऱ्या जलाशयांना 'नद' असं म्हटलं जातं. जे पूर्व, उत्तर आणि दक्षिणकडे वाहतात त्यांना नदी म्हटलं जातं.
भारतात जास्तीत जास्त नद्यांसोबतच ब्रम्हपुत्रेचीही एक कहाणी आहे. Heritage India च्या एका लेखानुसार, सृष्टीकर्ता ब्रम्हा, ऋषि शांतनुची पत्नी अमोघावर मोहित झाले होते. अमोघाने ब्रम्हाला स्वीकारलं नाही आणि परत पाठवलं. ब्रम्हाने ऋषि शांतनुला सांगितलं की, त्या संगमातून जन्माला येणाऱ्या अपत्याने संसाराला लाभ होईल. ऋषिने अमोघाला पुन्हा विचार करण्यास सांगितले. मात्र, अमोघा काही मानली नाही. ऋषिने आपल्या शक्तींनी अमोघा आणि ब्रम्हाचा संगम घडवून आणला. आणि अमोघाने पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं गेलं ब्रम्हकुंड. ब्रम्हकुंडाला ४ पर्वतांच्या मधे ठेवण्यात आलं आणि काळानुसार तेच ब्रम्हपुत्र बनलं.
ब्रम्हपुत्रा ही आशियातील सर्वात लांब नदी आहे. एका लेखानुसार, तिबेटमध्ये याची लांबी १६२५ किलोमीटर आहे. भारतात ९१८ किलोमीटर आणि बांग्लादेशात ३६३ किलोमीटर आहे. Quora वरील एका लेखानुसार, आसाममधील लोकांनी या नदीवर फार आस्था आहे. आसामची संस्कृती याच नदीच्या किनाऱ्यावर विकसित झाली.
भारतात आहेत अनेक 'नद'
भारतात एक नाही तर अनेक नद आहेत. अजय, दामोदर, रूपनारायण, पागला इत्यादी नद आहेत. नद्या नाहीत. हे सर्व पश्चिम बंगालमध्ये आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही भीम नद आहे.