उंटाच्या तोंडात का टाकला जातो विषारी किंग कोब्रा? वाचून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:28 AM2022-10-13T09:28:45+5:302022-10-13T09:30:39+5:30
Camel Eats King Cobra And Python: उंट एकावेळी 100 ते 150 लिटर पाणी पिऊ शकतो. पण त्याची एक अजब बाब म्हणजे उंटाच्या तोंडात विषारी साप टाकला जातो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
Camel Eats King Cobra And Python: तुम्ही आयुष्यात कधीना कधी उंटाची सवारी केली असेल किंवा उंट तर नक्कीच पाहिला असेल. वाळवंट असलेल्या भागात उंट जास्त बघायला मिळतात. या उंच प्राण्याबाबत लोकांमध्ये चांगलंच आकर्षण असतं. उंट एकावेळी 100 ते 150 लिटर पाणी पिऊ शकतो. पण त्याची एक अजब बाब म्हणजे उंटाच्या तोंडात विषारी साप टाकला जातो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
का टाकला जातो उंटाच्या तोंडात साप
उंटाला वयानुसार एक अजब आजार होतो, ज्यात उंट खाणं-पिणं सोडत असतो. यादरम्यान उंटाचं शरीर आखडू लागतं. उंटाचे मालक उंटाचा हा आजार दूर करण्यासाठी जो उपचार करतात तो फारच अजब आहे. या उपचारासाठी विषारी सापाचा वापर केला जातो. या आजारा उंटाला ताप, डोळ्यातून पाणी, एनीमिया, शरीर फुगणं आणि ऊर्जा कमी होणं अशा समस्या होऊ लागतात. जर वेळीच उपचार केले नाही तर उंटाचा जीवही जाऊ शकतो.
काय आहे उपचाराचं सीक्रेट
असं मानलं जातं की, उंटाचा आजार बरा करण्यासाठी किंग कोब्रा किंवा इतर विषारी साप उंटाच्या तोंडात टाकला तर उंट बरा होतो. त्यानंतर लगेच उंटाचा खूपसारं पाणी प्यायला दिलं जातं. जेणेकरून साप त्याच्या पोटात जावा. या आजाराचं नाव Hyam. असं सांगितलं जातं की, याने सापाचं विष उंटाच्या शरीरात पसरतं. हळूहळू विषाचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि उंट बरा होतो.
अभ्यासक उंटाच्या या अजब आजाराबाबत जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे उंटाच्या मालकांना असा हा अजब उपचार करावा लागतो. पण वैज्ञानिक या उपचाराची पुष्टी करत नाहीत. काही अभ्यासक सांगतात की, उंटाचा हा आजार एखादा कीडा चावल्याने होऊ शकतो.