ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स नेहमी ब्राऊन कलरचाच का असतो?; जाणून घ्या, यामागचं हटके कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:02 PM2022-10-22T13:02:01+5:302022-10-22T13:06:18+5:30

तुमच्या घरी कुरिअरने दिलेले हे पार्सल तुम्ही कधी जवळून पाहिले आहे का? जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर तुम्हाला दिसेल की ते ब्राऊन कलरच्या बॉक्समध्ये येते

why delivery box and paper are of brown colour know the reason | ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स नेहमी ब्राऊन कलरचाच का असतो?; जाणून घ्या, यामागचं हटके कारण

ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स नेहमी ब्राऊन कलरचाच का असतो?; जाणून घ्या, यामागचं हटके कारण

googlenewsNext

काळ बदलत आहे आणि त्यासोबतच लोकांची जगण्याची पद्धतही बदलत आहे. त्यांच्या खाण्याच्या सवयी, काम करण्याची पद्धत देखील बदलत आहे. उदाहरणार्थ, पूर्वी लोकांना ऑफिसला जाऊन काम करावे लागत होते परंतु आता बरेच लोक घरून काम करत आहेत, त्याचप्रमाणे लोकांची खरेदी करण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता लोकांना बाजारात जाऊन दुकानात खरेदी करण्यात रस नाही. आजचे युग ऑनलाईन शॉपिंगचे आहे. लोक घरी बसून त्यांच्या गरजेच्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतात, ज्या कुरियरद्वारे त्यांच्या घरी येतात. 

ऑनलाईन शॉपिंग देखील लोकांना आकर्षित करते कारण त्यांच्या आवडत्या वस्तू घरबसल्या ऑर्डर केल्या जातात. तुम्ही ऑनलाईन खरेदीही केली असेल, पण तुमच्या घरी कुरिअरने दिलेले हे पार्सल तुम्ही कधी जवळून पाहिले आहे का? जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर तुम्हाला दिसेल की ते ब्राऊन कलरच्या बॉक्समध्ये येते. बॉक्समध्ये येणारे कुरिअर नेहमीच ब्राऊन कलरचेच असतात हेही तुम्ही पाहिलं असेल.

 हे असं का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे बॉक्स नेहमीच ब्राऊन रंगाचे का असतात? तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचे एक महत्त्वाचे कारण सांगत आहोत. ज्या कुरिअर बॉक्समधून पार्सल आपल्यापर्यंत पोहोचतं ते कॉर्पोटचे बनलेले असतात. संपूर्ण कॉर्पोट कागदाचा बनलेला आहे. नैसर्गिक कागद ब्लीच केलेले नसतात, त्यामुळे ते ब्राऊन कलरचे असतात. म्हणूनच कुरिअरमध्ये येणारे डिलिव्हरी बॉक्स ब्राऊन कलरचे असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: why delivery box and paper are of brown colour know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.