हे लोक का झाले मानोरुग्ण?

By admin | Published: March 26, 2017 12:27 AM2017-03-26T00:27:44+5:302017-03-26T00:27:44+5:30

उत्तर भारतात एकाच गोत्रात विवाह करणाऱ्यांविरुद्ध खाप पंचायतींचे जाचक आदेश आपल्याला माहिती आहेत.

Why did these people become homosexual? | हे लोक का झाले मानोरुग्ण?

हे लोक का झाले मानोरुग्ण?

Next

उत्तर भारतात एकाच गोत्रात विवाह करणाऱ्यांविरुद्ध खाप पंचायतींचे जाचक आदेश आपल्याला माहिती आहेत. जवळच्या नात्यांतील लग्नामुळे लोकांना भयंकर मानसिक आजाराचा सामना करावा लागू शकतो, हे आपण कधी ऐकलेले नाही. इंडोनेशियात सध्या याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. ‘कमपुंग इडियट’ म्हणजेच ‘डॉग सिंड्रोम’ या नावाचा हा मानसिक आजार आहे. जवळच्या नात्यांतील शारीरिक संबंधांतून जन्माला येणाऱ्या मुलांना हा आजार होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या इंडोनेशियात प्रचंड असल्याची चर्चा आहे. हे लोक देहभान विसरलेले असतात. इंडोनेशियात त्यांना साखळदंडांत बांधून ठेवले जाते. लोक त्यांना शापित मानतात. इंडोनेशियातील करंगपटिहान या गावासह अनेक गावांत असे रुग्ण आढळून येतात. १0 वर्षांपासून ५0 वर्षांपर्यंतचे रुग्ण त्यात आहेत.
जवळच्या नात्यातील विवाहामुळेच या लोकांची अशी स्थिती झाली का, याबाबत येथे मतभेद दिसून आले आहेत. काही लोकांच्या मते कुपोषण आणि आयोडिनच्या कमतरतेमुळे त्यांना हा विकार जडला आहे.
वास्तविक अशा लोकांना डांबून ठेवण्यास इंडोनेशिया सरकारने १९७0 सालीच बंदी घातली आहे. तथापि, या कायद्याचे पालन होताना दिसत नाही. त्यांना उपचाराची गरज असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Web Title: Why did these people become homosexual?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.