वटवाघळं उलटे का लटकतात? जाणून घ्या इंटरेस्टींग गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:20 PM2023-12-14T12:20:27+5:302023-12-14T12:20:59+5:30

Interesting Facts About Bats : वटवाघळांचं अस्तित्व डायनॉसॉरच्या आधीपासून होतं. ते सगळ्यात जास्त तापमान असलेल्या वाळवंटातही राहतात आणि सगळ्यात थंड प्रदेशातही राहतात.

Why do bats hang upside down when resting know the reason | वटवाघळं उलटे का लटकतात? जाणून घ्या इंटरेस्टींग गोष्टी

वटवाघळं उलटे का लटकतात? जाणून घ्या इंटरेस्टींग गोष्टी

Interesting Facts About Bats : वटवाघळांबाबत जास्तीत जास्त लोकांना केवळ हेच माहीत आहे की, त्यांच्यामुळे व्हायरस पसरतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, वटवाघळं नेहमीच उलटे का लटकलेले असतात? ते जमिनीवरून थेट उडत नाहीत. वटवाघूळ हे जगातील सगळ्यात अजब जीव आहेत. वटवाघळं वाळवंटातही आढळतात आणि बर्फाळ प्रदेशातही आढळतात. चला जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

असं सांगितलं जातं की, वटवाघळांचं अस्तित्व डायनॉसॉरच्या आधीपासून होतं. ते सगळ्यात जास्त तापमान असलेल्या वाळवंटातही राहतात आणि सगळ्यात थंड प्रदेशातही राहतात. यांच्यात काही अद्भुत क्षमताही असतात. मेक्सिकन वाटवाघळं उंच उडू शकतात. तर लहान भुरक्या रंगाचे वाटवाघळं असे झोपतात बघून वाटतं ते श्वास घेतच नाहीयेत. 

मासे पकडणाऱ्या वटवाघळांमध्ये एक खास सेंसर असतं, त्यामुळे त्यांना इतर जीवांच्या तुलनेत मासे लवकर दिसतात. काही वटवाघळांचे पंख मनुष्यांच्या केससारखे पातळ असतात. वटवाघळांचा रंग केवळ काळा नसतो तर होंडुरन नावाचे वटवाघळं पांढरे असतात. त्याचं नाक पिवळं असतं.

आता मुख्य प्रश्न हा आहे की, इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघळं जमिनीवरून का उडू शकत नाहीत. कारण त्यांच्या पंखांमुळे त्यांना मोठी झेप घेता येत नाही आणि त्यांचे मागचे पाय इतके लहान व अविकसित असतात की, धावून वेग पकडू शकत नाहीत. उलटे लटकून राहिल्यावरच त्यांना सहजपणे उडता येतं. वटवाघळं सामान्यपणे अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात. रात्रीच बाहेर निघतात. ते झोपलेले असताना खाली का पडत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या पायांची खास बनावट. पायांचे पंजे त्यांचं वजन उचलण्यास मदत करतात.

वटवाघळांची बनावट ही वातावरणाच्या हिशेबाने होते. काही वटवाघळांचे पंख लांब असतात. हे लाल, काळे आणि पांढरे असतात. थायलॅंडमधील भौरा वटवाघळं सगळ्यात कमी वजनाचं असतं. इंडोनेशियात आढळणारे वटवाघळं 6 फुटापर्यंत पंख पसरतात. लॅटिन अमेरिकेत आढळणारे 70 टक्के वटवाघळं केवळ रक्त पितात. कॅनडामध्ये आढळणारे वटवाघळं कीटक खातात.

Web Title: Why do bats hang upside down when resting know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.