डॉक्टरांचे अक्षर कोणालाच का कळत नाही? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:32 PM2020-01-11T17:32:32+5:302020-01-11T17:35:23+5:30
आपण दवाखान्यात वेगवेगळ्या कारणांसाठी जात असतो.
आपण दवाखान्यात वेगवेगळ्या कारणांसाठी जात असतो. अनेकदा डॉक्टरांनी देलेले प्रिस्क्रिपशन आपल्याला समजण्यास कठीण जातं. काय लिहीलंय आपल्याला काही कळत नाही मग आपण मेडिकलवाल्या व्यक्तीला विचारतो. ही गोळी कशाची आहे आणि किती वेळा घ्यायची आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की डॉक्टरर्स अक्षर कधी कोणालाच का कळत नाही. असं ते कोणत्या सांकेतीक भाषेत लिहीत असतात की के कोणालाही कळतं नाही. असं अजिबात नसतं की खराब अक्षरं असणारे लोकं डॉक्टर असतात. आज आम्ही तुम्हाला डॉक्टरांच्या अशा अक्षरामागचं कारण सांगणार आहोत. तर मग जाणून घेऊया डॉक्टरर्स असं का लिहीतात.
डॉक्टरांना खूप लिहावं लागतं
डॉक्टरांना रोजचं काम करत असताना खूप लिहावं लागतं असतं. फक्त तुमची औषध नाही तर अनेक रुग्णांच्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन लिहावं लागतं. मेडीकलच्या संदर्भातील प्रत्येक गोष्टी बारकाईने लिहाव्या लागत असतात.
ताण-तणावाचा दिवस
ताण-तणावाचा दिवस असल्यामुळे एका दिवसात २५० ते ३०० रुग्णांना तपासणे. त्यांच्या लहानलहान गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांना अचुक औषध द्यायची तसंच त्यांना काही इमरजन्सी पेशंटसुध्दा पहावे लागतात. त्यात जास्तवेळ बसून काम केल्यामुळे त्यांच्या हातांच्या मासंपेशी थकलेल्या अवस्थेत असतात. म्हणून डॉक्टरांचे अक्षर कोणालाही समजण्यास कठिण जात असतं.
डॉक्टर खूप घाईत असतात.
डॉक्टरर्स खूप घाईत असतात. त्यांच्या कडे जास्त वेळ नसतो. एक गेल्यानंतर दुसरा पेशंट येत असतो त्यामुळे डॉक्टरांना कमी वेळात पेशन्टचं योग्य प्रिस्क्रिप्शन लिहायचं असतं म्हणून डॉक्टरर्स आपल्या अक्षराकडे जास्त लक्ष देत नाहीत. कारण त्यांना अक्षरापेक्षा जास्त काळजी पेपरवर लिहिल्या जात असेलेल्या प्रिस्क्रीपशनची असते.
विशिष्ट शब्दावली डॉक्टरांच्या खराब अक्षरासाठी जबाबदार आहे. पण फार्मासिस्टसना डॉक्टरांनी लिहिलेल्या सगळ्या शब्दाचे अर्थ बरोबर माहीत असतात. अनेकदा गैरसमज होण्याची सुद्धा शक्यता असते. लिखाणात असलेल्या लहान लहान चुकांमुळे सुध्दा अर्थ बदलू शकतो. अनेक ठिकाणी हाताने लिहिलेले प्रिस्क्रीप्शन हे बेकायदेशीर ठरवले जात आहे. २००६ च्या अहवालानुसार सुमारे ७००० लोकांचे मृत्यू चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे झाले आहेत.