श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:36 AM2023-08-01T09:36:14+5:302023-08-01T09:36:32+5:30
Dog Facts : मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे.
Dog Facts : तुम्ही जर श्वान प्रेमी असाल तर कधीना कधी तुमच्या लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही एखाद्या श्वानासोबत शांतपणे किंवा प्रेमाने बोलत असता तेव्हा ते डोकं एका बाजूला तिरपं करतात. तुम्हीही अनेकदा श्वानाचा हे वागणं पाहिलं असेलच. पण क्वचितच कुणाला माहीत असेल की, मनुष्याचा सगळ्यात चांगला मित्र असलेला हा प्राणी असं का करतो. मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे.
वैज्ञानिकांनुसार, श्वानांचा स्वभाव देखील असाच असतो. इओत्वोस लोरैंड यूनिवर्सिटी (Eotvos Lorand University) च्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, जगातले बरेच प्राणी जगातील दृश्य, ध्वनी आणि गंध फील करतेवेळी आपलं डोकं एका बाजूला झुकवतात.
श्वानांच्या हावभावाचा अभ्यास
शोधाचे प्रमुख लेखक एंड्रिया सोम्मेस म्हणाले की, आम्ही श्वानांच्या मालकांना सांगितलं की, त्यांना वेगवेगळ्या खेळण्यांची नावे सांगा. यादरम्यान श्वानांच्या हावभावाचा अभ्यास करण्यात आला. आम्हाला आढळून आलं की, त्यांच्या डोक्याची मुव्हमेंट आणि मालकाच्या आवाजात एक खास कनेक्शन आहे. आवाजाच्या टोननुसार, श्वास आपली मान एका बाजूला झुकवतात. जेव्हा मालक त्यांना समजावण्याच्या टोनमध्ये काही बोलतात तेव्हा श्वान डोकं एका बाजूला झुकवून त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात.
मनुष्य आणि पक्षीही असंच करतात
रिपन कॉलेजच्या साइंटिस्ट जूलिया मॅनर म्हणाल्या की, मनुष्य आणि पक्षीही असेच करतात. बऱ्याच वेगवेगळ्या प्रजाती आहेत जे अशाप्रकारे डोकं एका बाजूला झुकवतात. कारण ते कानांचा अॅंगल बदलतात. जेणेकरून त्यांना व्यवस्थित ऐकू यावं. घुबड याबाबतील चॅम्पियन असतात. ते त्यांची मान 270 डिग्रीपर्यंत फिरवू शकतात. अशाने त्यांना शिकार लवकर दिसते.
वैज्ञानिकांचं मत आहे की, श्वान वेगवेगळ्या ब्रीडचे असतात. यातील काही जास्त समजदार असतात. ते त्यांच्या मालकांचं बोलणं लगेच समजतात. शोधादरम्यान चांगल्या ब्रीडच्या 40 श्वानांनी शोधाच्या 43 टक्के वेळा आपलं डोकं एका बाजूला झुकवलं होतं. सोम्मेजनुसार, काही प्रतिभावान श्वानांनी डोकं त्याच दिशेला झुकवलं ज्या दिशेला मालक उभे होते.