डास मनुष्यांचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी शोधलं याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:48 PM2023-09-06T13:48:36+5:302023-09-06T13:48:46+5:30

Interesting Facts About Mosquito : अनेकांना हे माहीत नसेल की, डास आपलं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी या प्रश्नांचं उत्तर शोधलं आहे.

Why do mosquitoes drink human blood? Know the reason | डास मनुष्यांचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी शोधलं याचं कारण...

डास मनुष्यांचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी शोधलं याचं कारण...

googlenewsNext

Interesting Facts About Mosquito :डासांची समस्या सगळ्यांनाच जाणवते. डास म्हटले की, अनेकांच्या अंगावर काटे येतात. डास आपलं रक्त पितात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसेल की, डास आपलं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी या प्रश्नांचं उत्तर शोधलं आहे.

डास कुठून आले हे कुणालाच माहीत नाही. पण वैज्ञानिकांनुसार, डास हे पूर्वी कोरड्या प्रदेशात राहत होते. जेव्हा वातावरण उष्ण होत होतं तेव्हा डासांना प्रजननासाठी पाणी मिळत नव्हतं. अशात त्यांनी मनुष्यांचं आणि इतर प्राण्यांचं रक्त पिण्यास सुरूवात केली.

न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिव्हर्सिचीच्या वैज्ञानिकांनी आफ्रिकेतील एडीस एजिप्टी डासांवर अभ्यास केला. हे तेच डास असतात ज्यांच्यामुळे झिका व्हायरस परसतो. यांच्यामुळेच डेंग्यूही होतो.

न्यू सायंटिस्टमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, आफ्रिकेच्या डासांमध्ये एडीस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यात सांगितलं आहे की, सर्वच प्रजातींचे डास रक्त पित नाहीत. ते इतर काही द्रव्य पिऊन आपलं पोट भरतात.

प्रिंसटन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिक नोआह रोज यांनी सांगितलं की, कुणीही आतापर्यंत डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या खाण्या-पिण्याबाबत रिसर्च केला नाही. आम्ही आफ्रिकेतील सब-सहारन भागातील 27 ठिकाणांवरून एडीस एजिप्टी डासांची अंडी गोळा केली गेली.

त्या म्हणाल्या की, आम्ही या अंड्यांमधून डासांना बाहेर येऊ दिलं. नंतर त्यांना मनुष्य, अन्य जीव, डुकरांसारख्या प्राण्यांवर लॅबमध्ये बंद डब्यांमध्ये सोडलं. जेणेकरून त्यांचं रक्त पिण्याचं पॅटर्न समजू शकेल. एडीस एजिप्टी डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या डासांचं खाणं-पिणं एकदम वेगळं निघालं.

नोआह यांनी सांगितले की, ही बाब पूर्णपणे चुकीची सिद्ध झाली की सर्व प्रकारचे डास रक्त पितात. ज्या भागात दुष्काळ किंवा गरमी जास्त असते. तिथे पाणी कमी असतं. डासांना प्रजननासाठी ओलाव्याची किंवा थंडाव्याची गरज पडते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी डास मनुष्यांचं आणि इतर जीवांचं रक्त पिण्यास सुरूवात करतात.

डासांमध्ये हा बदल हजारो वर्षांआधी आला आहे. एडीस एजिप्टी डासांची खास बाब ही होती की, वाढत्या शहरांमुळे त्यांना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावं लागलं. तेव्हा त्यांना मनुष्यांच्या रक्ताची गरज पडू लागली.

पण जिथे मनुष्य पाणी जमा करून ठेवत होते, तिथे एनोफिलीस डासांना(मलेरिया पसरवणारे) काहीच समस्या होत नव्हती. ते त्यांचं प्रजनन कूलर, कुंड्या, घराचे कोपरे, गटार या ठिकाणांवर करतात. पण जशीही पाण्याची कमतरता होते ते लगेच मनुष्य आणि इतर जीवांचं रक्त पिऊ लागतात.
 

Web Title: Why do mosquitoes drink human blood? Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.