फोटो काढताना किंवा जिंकल्यावर लोक 'V' शेपमध्ये दोन बोटे का दाखवतात? कशी झाली सुरूवात....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 01:19 PM2021-04-05T13:19:12+5:302021-04-05T13:19:46+5:30

भारतात निवडणुकींवेळी अनेक नेते असं करताना दिसतात. पण प्रश्न हा आहे की, असं का केलं जातं? आणि या V शेप साइनची सुरूवात कुठून झाली? चला जाणून घेऊ याची उत्तरे...

Why do people often raise V shape two fingers and how its started | फोटो काढताना किंवा जिंकल्यावर लोक 'V' शेपमध्ये दोन बोटे का दाखवतात? कशी झाली सुरूवात....

फोटो काढताना किंवा जिंकल्यावर लोक 'V' शेपमध्ये दोन बोटे का दाखवतात? कशी झाली सुरूवात....

googlenewsNext

तुम्ही पाहिलं असेल की, काही लोक फोटो काढताना 'V' शेपमद्ये दोन बोटं वर करून दाखवतात. कदाचित तुम्हीही असं कधीतरी केलं असेल. भारतात निवडणुकींवेळी अनेक नेते असं करताना दिसतात. पण प्रश्न हा आहे की, असं का केलं जातं? आणि या साइनची सुरूवात कुठून झाली? चला जाणून घेऊ याची उत्तरे...

काय होतो अर्थ?

याचं उत्तर कोणत्याही संस्कृतीवर अवलंबून असतं. म्हणजे ब्रिटनमध्ये ही साइन एकप्रकारे आक्रामकता दाखवण्यासाठी वापरली जाते. सोबतच याचा वापर सेक्शुअल साइनच्या रूपातही केला जातो. हे साइन शांतीचं चिन्ह म्हणूनही वापरलं जातं. मात्र, सामान्यपणे या साइनचा वापर जास्तकरून कॉन्फिडन्स आणि डॉमिनन्स मानला जातो. जेव्हाही एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीत यश मिळवते. तेव्हा ती व्यक्ती 'V' शेपमध्ये बोटं दाखवते. सोबतच हे एकप्रकारे स्वत:ला कॉन्फिडंट आणि फ्रेंडली जाहीर करणंही असतं. आणि समोरच्याला हा विश्वास द्यायचा असतो की, तुम्ही एक विजेता आहात.

(Image Credit : awebic.com)

कशी झाली सुरूवात?

असे सांगितले जाते की, याची सुरूवात आशियामध्ये आणि खासकरून जपानमध्ये झाली. ज्याप्रकारे लोक फोटो काढताना 'चीज' म्हणतात तशी जपानमध्ये 'V' शेप फिंगर दाखवण्याची फॅशन आहे. इथूनच ही स्टाइल हळूहळू जगभरात पसरली.

जपानी मीडियाचे एक्सपर्ट प्रोफेसर Jason G. Karlin यांच्यानुसार, या साइनचा प्रचार करण्यात मीडियाचा मोठा हात होता. त्यांनी सांगितले की, १९७२ मध्ये एक जपानी कॅमेरा कंपनी Konica ने आपल्या टीव्ही जाहिरातीत एक पॉप सिंगर Jun Inoue ला घेतलं होतं. तो स्टेजवर 'V' साइन दाखवण्यासाठी फेमस होता. त्याने जाहिरातीतही असं साइन दाखवलं. जे नंतर फेमस झालं.

असं असलं तरी याच्या सुरूवातीबाबत इतरही काही कथा आहेत. काही लोक याची सुरूवात आशियाऐवजी पाश्चिमात्य देशांमध्ये झाल्याचं सांगतात. असे म्हणतात की, त्यावेळी Jun Inoue  असा एकटा नव्हता जो हे साइन वापरत होता. त्यावेळी अमेरिकन पॉप्युलर स्केटर Janet Lynn यानेही हे साइन वापरलं होतं.

१९७२ च्या विंटर ऑलंम्पिकमध्ये पाच वेळा यूएस चॅम्पियन राहिलेली स्केटर Janet स्केटिंग दरम्यान पडली होती. त्यावेळी ती गोल्ड मेडलची दावेदार मानली जात होती. पण जेव्हा ती पडली तेव्हा निराश होण्याऐवजी हसत निघून गेली. नंतर एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, तिने 'V' साइन शांती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरलं होतं. नंतर तो एक ट्रेन्ड झाला. 

(Image Credit : bradcatblog.wordpress.com)

तेच थेअरी सांगते की, हे जेस्चर जपानमध्ये द्वितीय महायुद्धात त्यांचा पराभव झाल्यावर आलं. युद्धात अमेरिका, फ्रान्ससारख्या मित्र राष्ट्रांचा विजय झाला होता. अशात त्यांनी हळूहळू पाश्चिमात्य संस्कृती पसरवण्यास सुरूवात केली. यादरम्यान रॉक म्युझिकपासून ते कोकाकोलापर्यंत जपानमध्ये पॉप्युलर होत होतं. V साइन यादरम्यानच जपानमध्ये पॉप्युलर झालं असेल. 

तसे काही लोक V साइनची सुरूवात इंग्रज आणि फ्रान्स यांच्यातील १४१५ मध्ये झालेल्या एगिनकोर्ट युद्धालाही मानलं जातं. असे म्हणतात की, इंग्रज सैनिकांनी फ्रान्सची खिल्ली उडवण्यासाठी या साइनचा वापर केला होता. या युद्धात इंग्रजांच्या विजयात तीरंदाजांचा मोठा सहभाग होता. फ्रान्स सैनिकांनी धमकी दिली होती की, ते जेव्हा या तीरंदाजांना पकडतील तेव्हा त्यांची बोटे कापतील. अशात जेव्हा ते हरले इंग्रजी सेनेने आपली दोन्ही बोटे V शेपमध्ये दाखवून त्यांची खिल्ली उडवली होती.
 

Web Title: Why do people often raise V shape two fingers and how its started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.