स्वप्नात साप दिसण्याचं काय असतं कारण? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:20 AM2023-08-01T10:20:42+5:302023-08-01T10:22:39+5:30
Snake in Dream : काही लोकांना स्वप्नात साप दिसल्याचं तुम्ही ऐकलं असेल. लोकांना स्वप्नात साप दिसला की, ते घाबरून उठतात. पण स्वप्नात साप का दिसतात?
Snake in Dream : स्वप्ने तर सगळेच बघतात. तर काही लोकांना आपोपाप स्वप्ने दिसतात. स्वप्नांबाबत नेहमीच मनुष्यांमध्ये उत्सुकता असते. डोळे बंद असूनही स्वप्ने कशी पडतात असा प्रश्नही अनेकांना पडत असेल. हे सहज येतात की त्यामागे काही संकेत असतात? हे जाणून घेण्यात काही ड्रीम एक्सपर्ट्स आपली मदत करत असतात.
काही लोकांना स्वप्नात साप दिसल्याचं तुम्ही ऐकलं असेल. लोकांना स्वप्नात साप दिसला की, ते घाबरून उठतात. पण स्वप्नात साप का दिसतात? याचं कारण ड्रीम एक्सपर्ट Lauri Quinn Loewenberg ने सांगितलं. त्यानी सांगितलं की, सापांच्या स्वप्नांकडे कधीच दुर्लक्ष करू नये. ते तुमच्या आयुष्यासंबंधी काही रहस्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक साप दिसण्याचं एक कारण असतं.
काय असतं याचं कारण?
Autumn Fourkiller नुसार, सापाचं स्वप्नात येणं एखाद्या इशाऱ्यासारखं असतं. ते म्हणाले की, तुमच्या आयुष्यात एखादी घातक किंवा विश्वास तोडणारी व्यक्ती आहे किंवा अशी घटना होणार आहे. इतकंच काय तर स्वप्नात आपल्या कोणत्या प्रजातीचा साप दिसतो, तेही संकेत देण्यासाठी पुरेसे असतात.
जर कुणी स्वप्नात बिनविषारी साप दिसला असेल तर समजून घ्यावी की, त्यांच्या आयुष्यात कुणीतरी घातक होतं. पण आता नाहीये. रॅटलस्नेक दिसण्याचा अर्थ होतो की, तुमच्या आयुष्यात कुणीतरी विषारी किंवा टॉक्सिक व्यक्ती आहे. बोआ कॉन्स्ट्रिक्टर साप दिसण्याचा अर्थ तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे.
साप दिसण्याची जागाही महत्वाची
जर तुम्हाला स्वप्नात साप घरात दिसला असेल लवकरच तुमच्यासमोर काहीतरी अडचण येणार असं मानलं जातं. जर तुम्हाला साप बाहेर दिसला तर कुणीतरी बिनधास्त तुमच्यासमोर येणार आहे. जर स्वप्नात सापाने तुम्हाला दंश मारला असेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकते. जर दुसऱ्याला साप दंश मारताना दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवहाराबाबत सतर्क व्हावं लागेल. जर स्वप्नात साप दुसऱ्याला दंश मारत आहे म्हणजे तुमच्या समोरच्या व्यक्तीला नुकसान पोहोचवत आहात. जर वैऱ्याला साप दंश मारताना दिसलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला त्याचं नुकसान करायचं आहे.