दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? स्टडीमधून समोर आली 'ही' बाब...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 06:47 PM2023-01-25T18:47:12+5:302023-01-25T18:48:17+5:30

दारू पिण्याचे फायदे आणि तोटे, यावर अनेकदा संशोधन झाले आहे.

Why do people start speaking English after drinking alcohol? study says this... | दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? स्टडीमधून समोर आली 'ही' बाब...

दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? स्टडीमधून समोर आली 'ही' बाब...

Next


दारू प्यायल्यानंतर अनेकजण विचित्र वागणूक करतात. अनेकजण दुःखात जातात, तर काहीजण जुन्या आठवणीत जातात. यात सर्वात मजेशीर बाब म्हणजे, काहीजण दारू प्यायल्यावर अस्खलित इंग्रजी बोलू लागतात. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, मद्यपान केल्यावर मानवाची एखाद्या अवघड भाषेसंबंधात असलेली चिंता कमी होते आणि ते अवघड भाषा सहज बोलू लागतात. काही अभ्यासांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, दारू प्यायल्यानंतर व्यक्तीची सोशल ऐंग्झायटी कमी होते.

संशोधनात ही माहिती समोर आली...
लिव्हरपूल युनिव्हर्सिटी आणि किंग्ज कॉलेज लंडनमध्ये सेकंड लँग्वेज आणि अल्कोहोल यांच्या संबंधावर अभ्यास करण्यात आला आहे. दोन भाषांचे ज्ञान असलेले लोक थोडीशी दारू प्यायल्यानंतर दुसरी भाषा बोलण्यात अधिक चांगले होतात, अशी बाब यातून समोर आली आहे. पन्नास लोकांनी अभ्यासात भाग घेतला होता. विशेष म्हणजे या लोकांना काय प्यायला दिले जात आहे हे देखील सांगण्यात आले नाही. परिणामांमध्ये असे दिसून आले की, जे लोक मद्यपान करतात त्यांना दुसरी भाषा बोलण्यात काहीच अडचण आली नाही.

चिंता कमी होते
शास्त्रज्ञांनी असाही निष्कर्ष काढला आहे की, अल्प प्रमाणात अल्कोहोल मानवाच्या प्रोनाउंसीएशन आणि दुसरी भाषा शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. मात्र, जास्त दारू प्यायल्याने उलट परिणाम होतात. त्यामुळे जीभ लडबडायला लागते आणि मेंदूही नीट काम करत नाही. असेही मानले जाते की अल्कोहोलची थोडीशी मात्रा तुमची चिंताही कमी करण्यास मदत करते. शास्त्रज्ञांनीदेखील मान्य केले की, अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी आणखी काही संशोधन आवश्यक आहेत.

Web Title: Why do people start speaking English after drinking alcohol? study says this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.