डोळ्यावर काळी पट्टी का बांधतात समुद्री डाकू? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:45 PM2022-02-05T18:45:07+5:302022-02-05T18:46:48+5:30

Pirates Interesting Facts : तुम्हाला माहीत आहे का की, हे समुद्री डाकू डोळ्यावर पट्टी बांधून ते झाकतात का? असं केल्याने त्यांना फायदा काय मिळतो? अशा प्रकारचा अवतार पायरेट्स ऑफ द कॅरेबियनमध्ये पाहिला असेल.

Why do pirates wear black bands on their eyes, know the reason | डोळ्यावर काळी पट्टी का बांधतात समुद्री डाकू? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....

डोळ्यावर काळी पट्टी का बांधतात समुद्री डाकू? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....

googlenewsNext

बहुतेक सर्वांनीच समुद्री डाकूंच्या कथा, कार्टून किंवा सिनेमे पाहिले असतील. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की, समुद्री डाकू हे त्यांच्या डोळ्यांवर लाल किंवा काळ्यावर रंगाची पट्टी लावून डोळा झाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, हे समुद्री डाकू डोळ्यावर पट्टी बांधून ते झाकतात का? असं केल्याने त्यांना फायदा काय मिळतो? अशा प्रकारचा अवतार पायरेट्स ऑफ द कॅरेबियनमध्ये पाहिला असेल.

डोळ्यावर पट्टी बांधण्याचं कारण

मनुष्याचे डोळे हे त्याच्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव असतात. ज्यांच्या मदतीने आपण बाहेरील जग बघू शकतो. अशात जेव्हा मनुष्य उजेडातून अंधाराकडे जातो तेव्हा डोळ्यांची बुबुळं सामान्यपेक्षा जास्त पसरतात. असं होतं कारण डोळ्यांना जास्तीत जास्त प्रकाश मिळावा आणि ते अंधारातही व्यवस्थित बघू शकतील. पण जेव्हा व्यक्ती अंधारातून बाहेरच्या प्रकाशात येतो तेव्हा डोळ्यातील बुबुळं ना परसतात ना आकुंचन पावतात. उलट उजेडाच्या संपर्कात आल्यावर वातावरणानुसार डोळे काम करणं सुरू करतात. ज्यामुळे समुद्री डाकूंना डोळ्यावर ही पट्टी बांधावी लागते.

त्यांना काय फायदा होतो?

जर समुद्री डाकूंबाबत सांगायचं तर ते अनेक महिने समुद्रात पाण्यात प्रवास करत असतात. यादरम्यान त्यांना पुन्हा पुन्हा डेकवर जावं लागतं आणि सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवावं लागतं. जिथे फारच अंधार असतो. अशात डाकू जेव्हा डेकमध्ये शिरतात तेव्हा आपल्या डोळ्यावरील लाल किंवा काळ्या रंगाची पट्टी बाजूला करता. जेणेकरून अंधारात त्यांना सहजपणे दिसावं. जर समुद्री डाकूंनी त्यांच्या एका डोळ्यावर पट्टी बांधली नाही तर त्यांना उजेडातून अंधाराकडे गेल्यावर स्पष्टपणे दिसणार नाही. अशात ते जहाजाची सुरक्षा योग्य प्रकारे करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या डोळ्याची खास काळजी घ्यावी लागते.

समुद्री डाकूंना एका  डोळ्यावर पट्टी बांधण्याचा हा फायदा होतो की, जेव्हा ते उजेडातून अंधारात जातात तेव्हा त्यांच्या डोळ्याचं बुबुळ पसरण्यास जास्त वेळ लागत नाही. कारण त्याला आधीच अंधारात राहण्याची सवय झालेली असते.

फार जुना आहे डोळ्यावर पट्टी बांधण्याचा नियम

समुद्री डाकूंचा एका डोळ्यावर पट्टी बांधण्याचा नियम फार जुना आहे. हा नियम अनेक पिढ्यांपासून फॉलो केला जातो. या नियमामुळे दुश्मनांसोबत लढण्यासाठी डाकूंना दोन्ही डोळे अंधारात आणि प्रकाशाच्या स्थितीसाठी तयार ठेवावे लागतात. रात्री समुद्री डाकू आपल्या डोळ्यावरून पट्टी काढू शकतात. कारण त्यावेळी चारही बाजूने अंधार असतो आणि डोळ्याच्या बुबुळांना जास्त काम करण्याची गरज पडत नाही.
 

Web Title: Why do pirates wear black bands on their eyes, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.