पाण्याच्या बॉटलवर Lines का असतात? जाणून घ्या याचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:03 PM2022-08-29T15:03:40+5:302022-08-29T15:07:23+5:30
Why Do Plastic water Bottles Have Lines: तुम्ही जर कधी पाण्याची बॉटल विकत घेतली असेल तर पाहिलं असेल की, बॉटवर गोल आडव्या लाईन्स असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बॉटलवर या अशा लाईन्स का असतात?
Why Do Plastic water Bottles Have Lines: पाणी हे मनुष्याची पहिली गरज आहे. ज्याशिवाय जगण्याचा मनुष्य विचारही करू शकत नाही. जगण्यासाठी मनुष्याला पाण्याची गरज असतेच. बरेच लोक घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल बॅगमध्ये ठेवतात. पण कधी कधी अशीही वेळ येते की, आपल्याला पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. त्यासाठी लोक बॉटलमधील पाणी विकत घेतात.
तुम्ही जर कधी पाण्याची बॉटल विकत घेतली असेल तर पाहिलं असेल की, बॉटवर गोल आडव्या लाईन्स असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बॉटलवर या अशा लाईन्स का असतात? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तर ते आम्ही देणार आहोत.
फक्त डिझाइन म्हणून नसतात या लाईन्स
गेल्या काही वर्षांपासून लोक नेहमीच पाण्याची बॉटल विकत घेऊ लागले आहेत. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, पाण्याच्या बॉटलवर या लाईन्स का असतात. वेगवेगळ्या बॉटलवर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स असतात. पण जास्तीत जास्त बॉटल्सवर आडव्या लाईन्स असतात. बऱ्याच लोकांना या लाईन्स केवळ डिझाइन वाटत असतील. पण यामागचं खरं कारण वेगळंच आहे. त्यामाने विज्ञान आहे.
काय आहे लाईन्सचं कारण?
पाण्याच्या या बॉटल्स तयार करण्यासाठी हार्ट प्लास्टिकचा नाही तर सॉफ्ट प्लास्टिकचा वापर केला जातो. तर बॉटलवर असलेल्या या लाईन्समुळे बॉटलला मजबुती मिळते. जर या लाईन्स बनवल्या गेल्या नाही तर बॉटल सहजपणे फोल्ड होऊ शकते. तसेच बॉटल फुटण्याचाही धोका असतो.
चांगल्या ग्रीपसाठी
त्यासोबतच पाण्याच्या बॉटलवर असलेल्या या लाईन्समुळे चांगली ग्रीप मिळण्यासही मदत होते. ज्यामुळे तुम्ही सहजपणे बॉटल पकडू शकता. अशात बॉटल हातातून सटकून पडण्याची रिस्कही कमी होते. या दोन कारणांसोबतच बॉटलवरील लाईन्समुळे बॉटलचं सौंदर्यही वाढतं.