तुरूंगात कैद्यांना का दिले जातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे? कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 05:03 PM2023-04-25T17:03:17+5:302023-04-25T17:03:34+5:30
Prisoner Dress Code : तुरूंगातील कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे दिलेले असतात. पण यांना असेच कपडे का दिले जातात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का...
Prisoner Dress Code : कोर्टातील वकिलांचे कपडे, डॉक्टरांचे कपडे हे नेहमीच लक्षात राहणारे कपडे असतात. अनेक सिनेमांमध्ये किंवा प्रत्यक्षात आपण ते पाहिलेले असतात. असाच एक खास ड्रेस कोड आधीच्या सिनेमात खूप बघायला मिळायचा. तो म्हणजे कैद्यांचा ड्रेस. तुरूंगातील कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे दिलेले असतात. पण यांना असेच कपडे का दिले जातात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का...पडला असेल तर चला जाणून घेऊया याचं उत्तर...
असं सांगितलं जातं की, कैद्यांना तुरूंगात गेल्यावर दोन जोडी कपडे दिले जात होते. त्यांची पूर्ण शिक्षा याच कपड्यांवर संपायची. नंतर १८व्या शतकात अमेरिकेत ऑबर्न प्रिजन सिस्टम लागू करण्यात आली. ज्यानुसार ज्या कैद्यांना कठोर शिक्षा दिली जात होती, त्यांच्याकडून मेहनत करून घेतली जात होती.
कैद्यांना एकमेकांसोबत बोलण्यासही मनाई होती. या सिस्टमनुसार कैद्यांसाठी एक मोठा बदल करण्यात आला. तो म्हणजे कैद्यांचे कपडे बदलणे. तेव्हा कैद्यांना तुरूंगाच्या थीमनुसार ग्रे-ब्लॅक कलरचे पट्टे असलेले कपडे दिले होते.
काही मीडिया रिपोर्टनुसार, याचं सर्वात मोठं कारण होतं की, कैद्यांना एक निश्चित प्रकारचे कपडे असले तर ते पळून गेल्यावर त्यांना लोक लगेच ओळखतील आणि ते पोलिसांना सूचना देतील. त्यासोबतच ड्रेस कोड असल्याने कैद्यांमध्ये एक शिस्त येईल.
ड्रेससंबंधी खास बाब ही सुद्धा होती की, ग्रे-ब्लॅक पट्ट्यांना एक 'सिंबल ऑफ शेम'च्या रूपात पाहिलं जात होतं. पण जेव्हा कैद्यांच्या मानवाधिकारबाबत बोलणं झालं तेव्हा 'सिंबल ऑफ शेम' हटवण्यात आला. त्यानंतर १९व्या शतकात काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्ट्या असलेले कपडे दिले जाऊ लागले होते.
प्रत्येक देशात वेगळे ड्रेस
प्रत्येक देशातील कैद्यांना वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकारचे कपडे दिले जातात. कारण प्रत्येक देशाचा आपला वेगळा ड्रेस आहे. भारतात अशाप्रकारच्या कपड्यांची सुरूवात इंग्रजांच्या काळातच झाली होती. त्यावेळीच कैद्यांच्या मानवाधिकाराचा विषय निघाला होता. तेव्हापासून हा ड्रेस कैद्यांना दिला जातो. पण हा ड्रेस सर्वच कैद्यांना दिला जात नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या कैद्यांना शिक्षा सुनावली जाते त्यांनाच हे कपडे दिले जातात, ज्यांना केवळ ताब्यात घेतात त्यांना हे कपडे दिले जात नाहीत.