एकमेकांना बघून जांभई का येते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल याचं उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:23 PM2023-04-04T17:23:48+5:302023-04-04T17:25:44+5:30
Why do we yawn when see other :अनेकांना वाटतं की, जांबई येणं एखादं बॅक्टेरिअल किंवा व्हायरल संक्रमण तर नाही ना. पण एकमेकांना बघून असू का होतं? यावर वैज्ञानिकांनी अभ्यासही केला आहे.
Why do we yawn when see other : तुम्हीही अनेकदा नोटीस केलं असेल की, आपण जेव्हाही दुसऱ्यांना जांभई देताना बघतो तेव्हा आपल्याला आपाओप जांभई येते. अनेकदा तुम्हाला हा अनुभव आला असेल, पण कधी विचार केलाय का की, असं का होतं असेल?
अनेकांना वाटतं की, जांबई येणं एखादं बॅक्टेरिअल किंवा व्हायरल संक्रमण तर नाही ना. पण एकमेकांना बघून असू का होतं? यावर वैज्ञानिकांनी अभ्यासही केला आहे. नंतर याचं जे कारण समोर आलं ते मेंदुशी संबंधित आहे.
इटालियन वैज्ञानिकांनुसार, याच्यामागे एका खास न्यूरॉनचा हात आहे. याला मिरर न्यूरॉन असं म्हणतात. जसं की, नावावरून समजतं की, हे न्यूरॉनच्या व्यक्तीचा प्रतिछाया तयार करतो.
हे न्यूरॉन काहीही नवीन शिकने, नक्कल करणे आणि सहानुभूती दाखवण्यासंबंधी आहे. याचा शोध जियाकोमो रिजोलाटी नावाच्या न्यूरोबायोलॉजिस्टने लावला होता. मनुष्यावर जेव्हा याबाबत अभ्यास झाला तेव्हा समजलं की, हे न्यूरॉन तंतोतंत तेच काम करतात जे समोरची व्यक्ती करत असेल. दुसऱ्या व्यक्तीचे न्यूरॉन अॅक्टिव होऊन त्यांनाही तसंच करण्यास सांगतात.
मिरर न्यूरॉन मेंदुचे चार भाग, प्री मोटर, इंफीरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब आणि सुपीरियल टेम्पोरल सुलकसमध्ये आढळतात. मेंदुच्या चारही भागांच्या काम करण्याच्या क्षमतेवर हे न्यूरॉन आपला प्रभाव पाडतात. पण ऑटिज्म, सीज़ोफ्रीनिया आणि मेंदुसंबंधी आजारामध्ये हे न्यूरॉन प्रभावित होतात आणि ते आधीसारखं प्रभावी काम करत नाहीत.